शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

सेवा सहकारी संस्थेत भूखंड घोटाळा?

By admin | Updated: May 1, 2015 00:14 IST

एकेकाळी ४० गावांचा कारभार पाहणाऱ्या देवरी येथील आदिवासी सेवा सहकारी संस्था....

गोंदिया : एकेकाळी ४० गावांचा कारभार पाहणाऱ्या देवरी येथील आदिवासी सेवा सहकारी संस्था र.नं.२५६ आज आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपड करीत असली तरी सेवेसाठी सहकार क्षेत्रातील राजकारण करुन आलेली मंडळी मात्र स्वहितासाठी संस्थेचे लचके तोडत आहे. काही सहकार नेत्यांनी सेवा सहकारी संस्थेच्या अवसायकास हाताशी धरुन कोट्यवधीची जमीन बळकावून तिथे गाळ्यांची निर्मिती करुन आपसात वाटणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात हा चर्चेचा विषय झाला आहे.प्राप्त माहितीनुसार, आदिवासी सेवा सहकारी संस्था देवरी र.नं. २५६ या संस्थेवर १९९० मध्ये अवसायकाची नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी संस्थेकडे तालुक्यातील परसोडी, बोरगाव/बाजार, चिचेवाडा, डवकी, लोहारा येथे प्रत्येकी एक तर देवरी येथे दोन गोदामासह मोक्यावर असलेली मोकळी जागा होती. आजमितीस या संस्थेच्या संपत्तीची बाजार भावाप्रमाणे कोटी रुपयांची मालमत्ता आहे. याच मालमत्तेपैकी देवरी येथील गट क्र.४४४ मध्ये ०.४९ आर जमिनीपैकी ०.०५ आर जागेत एका गोदामाचे बांधकाम करुन ०.४४ आर जागा दैनंदिन वापरासाठी मोकळी सोडण्यात आली होती. याच मोकळ्या जागेवर देवरी येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्था र.नं. १३२८ च्या सहकार नेत्यांची वक्रदृष्टी पडली आणि सेवा सहकारी संस्था र.नं. २५६ चे लचके कसे तोडले जातील याची व्यूहरचना करण्यात आली. त्यासाठी एम.एस. मेळे यांना हाताशी धरुन ती जागा आपलीच असल्याचा गाजावाजा करुन तेथे एकूण १२ गाळ्याची अनधिकृतपणे निर्मिती केली. या कामी सहकार नेत्यांना अन्य राजकारणी व्यक्तींनी अप्रत्यक्ष मदत करुन त्यांचे पुनर्वसन करण्याचे अभिवचन पूर्ण केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. वास्तविक पाहता अवसायक मेळे यांनी संस्थेवर जिल्हा बँकेचे असलेले १,५६,११४.७९ रुपये थकबाकी या गाळे विक्रीच्या व्यवहारातून करणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी स्वत:च सचिव असलेल्या आदिवासी विविध कार्यकारी संस्था देवरी र.नं. १३२८ च्या संचालक मंडळाच्या म्हणण्यावरुन अवसायनात असलेल्या संस्थेची जमीन हडप करण्याचा कुटील डाव आखला आणि हा डाव यशस्वीही झाल्याचे बोलले जाते. याची तक्रार सहायक निबंधक मोरगाव अर्जुनी यांच्याकडे २३ मार्च २०१५ रोजी केली असली तरी राजकीय दबावापोटी अधिकारी कारवाई करण्यास धजावत नसल्याचे बोलले जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)