यंदा ६० लाख क्विंटल धान खरेदीचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 05:00 IST2020-10-08T05:00:00+5:302020-10-08T05:00:25+5:30
जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात शासकीय धान खरेदी केली जाते. यासाठी शासनाची एजन्सी म्हणून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ हमीभावाने धान खरेदी करते. यंदा शासनाने शासनाने सर्वसाधारण धानाला १८६८ आणि अ दर्जाच्या धानाला १८८८ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. हमीभावापेक्षा कमी दर शेतकऱ्यांना मिळू नये यासाठी शासनाकडून धान खरेदी केली जाते.

यंदा ६० लाख क्विंटल धान खरेदीचे नियोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
गोदिया : शासनाने खरीप हंगामातील शासकीय धान खरेदी सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. येत्या २५ ऑक्टोबरपासून धान खरेदीला सुरूवात होणार आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने यंदा ७० धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे नियोजन केले आहे.
जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात शासकीय धान खरेदी केली जाते. यासाठी शासनाची एजन्सी म्हणून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ हमीभावाने धान खरेदी करते. यंदा शासनाने शासनाने सर्वसाधारण धानाला १८६८ आणि अ दर्जाच्या धानाला १८८८ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. हमीभावापेक्षा कमी दर शेतकऱ्यांना मिळू नये यासाठी शासनाकडून धान खरेदी केली जाते. जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ९९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली.
सध्या धानाची स्थिती पाहता यंदा समाधानकारक धानाचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने यंदा दोन्ही हंगामात एकूण ६० लाख क्विंटल धान खरेदी करण्याचे नियोजन केले आहे. मागीलवर्षी खरीप हंगामात ३७ लाख आणि रब्बी हंगामात २० लाख क्विंटल धान खरेदी केली होती. याच आधारावर हे नियोजन केले आहे. यासाठी ७० धान खरेदी केंद्र, ३९५ गोदामांची व्यवस्था केली आहे. खरेदीत वाढ झाल्यास गोदामांची संख्या वाढविली जाणार आहे. ७० केंद्रावर वेळेत धान खरेदी सुरू व्हावी यासाठी संबंधीत सहकारी संस्थाना यासंबंधिचे निर्देश देण्यात आले.
कर्मचाऱ्यांची रिक्त पदे केव्हा भरणार
शासकीय धान खरेदी केंद्रावरील सावळा गोंधळ पुढे येऊन सुध्दा अद्यापही या केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक कर्मचाºयांची पदे भरण्यात आली नाही. ४० कर्मचाऱ्यांची गरज असताना सध्या स्थितीत केवळ १२ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे धान खरेदी केंद्रावर नियंत्रण कसे ठेवणार असा प्रश्न कायम आहे.