शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पिंडकेपार लघु सिंचन प्रकल्प ठरतोय नाममात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:01 IST

५ जानेवारी १९८३ रोजी पिंडकेपार लघू सिंचन प्रकल्पाच्या कामासाठी राज्य शासनाकडून २.४३ कोटी रूपयांची प्रशासकीय मंजूरी देण्यात आली. परंतु सरकारने आवश्यक त्यावेळी रक्कम उपलब्धच केली नाही. यामुळे प्रकल्पाचे काम सुरूवातीपासूनच रेंगाळत गेले. याचेच परिणाम लगतच्या अनेक गावांना आज भोगावे लागत आहे. शासनाने प्रशासकीय मंजुरी तर दिली, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी कमी पडले, हेच या प्रकल्पाचे काम रेंगाळल्याने सिद्ध होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहराच्या पूर्व भागातील काही निवडक गावाला सुजलाम- सुफलाम करू शकणारा पिंडकेपार लघु सिंचन प्रकल्प सद्यस्थितीत नाममात्र ठरत आहे. ३६ वर्षानंतर या प्रकल्पाच्या कामाला पाहिजे तेवढी गती मिळालेली नाही. म्हणूनच हा प्रकल्प या गावातील नागरिकांना उपयोगी पडेल तर कधी, असा प्रश्न विचारला जात आहे.५ जानेवारी १९८३ रोजी पिंडकेपार लघू सिंचन प्रकल्पाच्या कामासाठी राज्य शासनाकडून २.४३ कोटी रूपयांची प्रशासकीय मंजूरी देण्यात आली. परंतु सरकारने आवश्यक त्यावेळी रक्कम उपलब्धच केली नाही. यामुळे प्रकल्पाचे काम सुरूवातीपासूनच रेंगाळत गेले. याचेच परिणाम लगतच्या अनेक गावांना आज भोगावे लागत आहे. शासनाने प्रशासकीय मंजुरी तर दिली, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी कमी पडले, हेच या प्रकल्पाचे काम रेंगाळल्याने सिद्ध होत आहे.सुरूवातीच्या काळात प्रकल्पाला रक्कमच मिळाली नाही. नंतर १९८८-८९ च्या सुमारास वन कायद्याच्या नावावर ह्या प्रकल्पात अडंगा टाकण्यात आला. मागच्या काही वर्षापूर्वीच वन कायद्याचा अडंगा दूर करण्यात आला, त्यानंतर ही वेळेवर योग्य पावले अचलली गेली नाहीत. ५ जानेवारी १९८३ रोजी प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या या प्रकल्पास तब्बल २५ वर्षे वाट पहावी लागली. सन २००९-१० मध्ये पहिल्यांदाच ४.२४ कोटी रूपये खर्च करण्यात आले. तत्पूर्वी सन २००७-०८, २००८-०९, २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७ मध्ये या प्रकल्पात एक पैसासुद्धा खर्च झालेला नाही. सन २०१०-११ मध्ये आठ लाख, सन २०१९-२० मध्ये नऊ लाख, सन २०१२-१३ मध्ये २.६० कोटी आणि सन २०१३-१४ मध्ये तीन लाख रूपये खर्च झाले. तर सन २०१८-१९ व २०१९-२० मध्ये मोजकीच रक्कम खर्च झाली.

टॅग्स :Waterपाणी