पिक वाहन उलटून १ गंभीर २ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 00:10 IST2018-05-03T00:10:28+5:302018-05-03T00:10:28+5:30
डीजे साऊंड सिस्टम घेऊन जाणारे बोलेरो पिकअप वाहन उलटून १ जण गंभीर तर दोन जण जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.२) दुपारच्या सुमारास देवरी चिचगड मार्गावर घडली.

पिक वाहन उलटून १ गंभीर २ जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : डीजे साऊंड सिस्टम घेऊन जाणारे बोलेरो पिकअप वाहन उलटून १ जण गंभीर तर दोन जण जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.२) दुपारच्या सुमारास देवरी चिचगड मार्गावर घडली.
प्राप्त माहितीनुसार चिचगडवरुन देवरीकडे धान भरुन येत असलेल्या ट्रक मधील धानाचे पोते अचानक खाली पडले व त्याच वेळी देवरीकडून गणुटोलाकडे जात असलेली बोलेरो पिकअप वाहन अचानक रस्त्यावर पडलेल्या धानाच्या कट्यांवर चढल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून गाडी उलटली.
यात पिकअपमध्ये बसलेला ललीत राजेंद्र लाडे (२३) रा. देवरी हा गंभीर जखमी झाला. तर सुशील परदेस राऊत (१६) रा. देवरी व कमलेश प्रेमलाल वाघमारे (२२) रा. कवलेवाडा हे जखमी झाले.
त्यांना देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.