शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायग्रस्त शिक्षकाने मागितली आत्मदहनाची परवानगी

By admin | Updated: October 29, 2015 00:17 IST

जिल्हा परिषद गोंदियाच्या शिक्षण विभागाने कोणतेही कारण नसताना शिक्षक एन.एल. माने यांचे निलंबन केले.

गोंदिया : जिल्हा परिषद गोंदियाच्या शिक्षण विभागाने कोणतेही कारण नसताना शिक्षक एन.एल. माने यांचे निलंबन केले. परंतु शिक्षणाधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर त्यांना निलंबित केल्याच्या कारणाला घेऊन त्यांनी कुटुंबासह आत्मदहन करण्याची परवानगी शिक्षक माने यांनी मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्याकडे केली आहे.शिक्षणाधिकाऱ्यांनी मुकाम यांची दिशाभूल करुन निलंबनाचा आदेश मंजुर करवून घेतला. २६ आॅगस्टपासून आजपर्यंत पुराव्यासह निवेदन देण्यात आले. ही माहिती माहितीच्या अधिकारात मागविण्यात आली. आयुक्त नागपूर यांनी या सनदर्भात तत्काळ कारवाई करण्याचे पत्र दिले. मात्र आयुक्तांच्या पत्राला सर्वांनी केराची टोपली दाखविली आहे.शिक्षण विभागाने खोटी टिपणी तयार केली. नियमबाह्य आरोप दर्शविण्यात आले. सेवाशिस्त अधिनियम १९६७ व १९६४ ची उधळपट्टी करण्यात आली. ज्या अर्थी टिपणी तयार करणारे आणि त्याला सहमती दर्शविणाऱ्यांना अधिनियमाची, कायद्याची जाणीव नसल्याचे कृत्य शिक्षण विभागाकडून झाले असल्याचे माने यांनी म्हटले आहे.अयोग्यरित्या, सुडभावनेतून, राजकीय दबावाखाली, जातीयवादातून कारवाई करण्यात आली. बचावाकरिता अभिलेखाची आणि निलंबनासंबंधी माहिती मागितल्यावर दिली जात नाही. या प्रकारामुळे माने परिवाराची आर्थिक कोंडी झाली आहे. कर्जाऊ रक्कमेवर मासिक व्यापाचा भूर्दंड बसत आहे.आपण कसलाही शिस्त भंग केली नसताना निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबनाचे आरोप लावण्यात आले त्याचे पूर्ण पुरावे जि.प. आणि विभागीय आयुक्त यांना देण्यात आले आहेत. या त्रासाला कंटाळून १४ आॅक्टोबरला राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे पत्र पाठवून एन.एल. माने आणि पत्नी सुमरना (निता) माने यांनी आत्मदहनाची परवानगी मागितली आहे. शिक्षणाधिकारी घनश्याम एन.पाटील, कक्ष अधिकारी व कनिष्ठ, वरिष्ठ सहायक तसेच टिपणीमध्ये कारवाईला डोळे मिटून शहनिशा न करता सहमती दर्शविणारे व अनुमोदीत करणारे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या जाचामुळे आत्मदहन करण्याची परवनागी माने कुटुंबियांनी मागीतली आहे.आत्मदहनाच्या परवानगीच्या पत्राची प्रत जिल्हाधिकारीच्या मार्फत देण्यात आली असून डाकद्वारे पाठविण्यात आल्या आहेत. पालकमंत्री राजकुमार बडोले, पोलीस अधीक्षक गोंदिया, पोलिस ठाणे ग्रामीण, मुकाअ गोंदिया यांना माहितीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)