संस्काराचे मोती ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST2020-03-03T05:00:00+5:302020-03-03T05:00:18+5:30
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत ‘लोकमत’ संस्काराचे मोती स्पर्धेच्या बक्षिस वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लाखन राणे, लोकमतचे वार्ताहर मुरलीदास गोंडाणे, सुनिता सोनवाने, स.शिक्षिका एस.के. चव्हाण, एन.पी.रिनाईत, पी.सी.कोठे, सी.डब्ल्यु. खोब्रागडे, एन.जे.चौरे, आर.एस.शहारे, पायल मेश्राम उपस्थित होते.

संस्काराचे मोती ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणारी
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदोरा बुजरुक : ग्रामीण भागातील शाळांतील विद्यार्थ्याना कुठली न कुठली स्पर्धा परीक्षा अतिमोलाची असते. त्याप्रमाणे ‘लोकमत’ वृत्तपत्राच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी संस्काराचे मोती ही स्पर्धा राबविली जाते. संस्काराचे मोती ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडणारी असल्याचे प्रतिपादन उच्चश्रेणी मुख्याध्यापक के.जे.शरणागत यांनी केले.
येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत ‘लोकमत’ संस्काराचे मोती स्पर्धेच्या बक्षिस वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लाखन राणे, लोकमतचे वार्ताहर मुरलीदास गोंडाणे, सुनिता सोनवाने, स.शिक्षिका एस.के. चव्हाण, एन.पी.रिनाईत, पी.सी.कोठे, सी.डब्ल्यु. खोब्रागडे, एन.जे.चौरे, आर.एस.शहारे, पायल मेश्राम उपस्थित होते.
याप्रसंगी गोंडाणे यांनी, देशातील अनेक घडामोडी प्रथम दर्शनी सादर करुन ‘लोकमत’ हा सर्वांचा आवडता दैनिक ठरला असल्याचे सांगीतले. राणे यांनी, संस्काराचे मोती या स्पर्धेची प्रशंसा केली.
दरम्यान, मानसी शंकरलाल ठाकरे, दीक्षा राजेंद्र अंबुले, टमेश्वरी मनोहर सोनवाने, टेकेश्वरी प्रेमलाल राऊत, आचल इंद्रकुमार ठाकरे, वैष्णवी मोहनलाल ठाकरे, खुशबू कुवरलाल आंबेडारे, लक्की नंदकिशोर सोनेवाने या विद्यार्थ्याना टिफीन बॉक्स व प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. संचालन स. शिक्षिका एस.के.चव्हाण यांनी केले. आभार एन.जे.चौरे यांनी मानले.