शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

कपात केलेले तीन दिवसांचे वेतन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 06:00 IST

राज्य कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने प्रलंबित अनेक मागण्यांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ७, ८ व ९ ऑगस्ट २०१८ रोजी तीन दिवसीय आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे समर्थन होते. म्हणून जिल्ह्यातील शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाची दखल शासनाने घेवून ९ ऑगस्ट २०१८ ला चर्चा केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते.

ठळक मुद्देप्राथमिक शिक्षक संघ : शासनाकडे पत्र पाठविले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रलंबित मागण्यांसाठी करण्यात आलेल्या आंदोलनांतर्गत कपात केलेले तीन दिवसांचे वेतन देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे. यासाठी संघाकडून शासनाला पत्र पाठवून वेतनाची मागणी करण्यात आली आहे.राज्य कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने प्रलंबित अनेक मागण्यांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ७, ८ व ९ ऑगस्ट २०१८ रोजी तीन दिवसीय आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे समर्थन होते. म्हणून जिल्ह्यातील शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाची दखल शासनाने घेवून ९ ऑगस्ट २०१८ ला चर्चा केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते. या तीन दिवसांचे वेतन कपात करण्यात येणार नाही अशी हमी शासनाने दिली होती. परंतु जिल्ह्यातील संपात सहभागी कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्यात आले. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.या तीन दिवसाचे वेतन काढण्यात यावे यासाठी राज्य कर्मचारी समन्वय समिती व प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने महाराष्ट्र शासनाला निवेदन देवून चर्चा केली आहे. त्या अनुषंगाने संदर्भाकित पत्रान्वये संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती सेवेतील खंड न समजता असाधारण रजा नियमित केली आहे. परंतु या पत्राद्वारे सेवा खंडीत होणार नाही, परंतु तीन दिवसाचे वेतन देय झाले नाही. तरी ,जिल्ह्यातील सर्व कर्मचाºयांचे संपकालीन कालावधीतील तीन दिवसांचे वेतन द्यावे अशी मागणी शिक्षक संघाने केली आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकMaharashtra State Primary Teachers Associationमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ