शहरात बनणार पार्किंग झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 20:59 IST2017-10-09T20:58:48+5:302017-10-09T20:59:11+5:30

शहरातील बेशीस्त पार्किंग व्यवस्था, पोलीस कर्मचाºयांसाठी क्वाटर्स व रावणवाडी तसेच रामनगर पोलीस ठाण्यांच्या बांधकामाच्या विषयाला घेऊन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांच्यासोबत बैठक घेतली.

Parking zone to be built in the city | शहरात बनणार पार्किंग झोन

शहरात बनणार पार्किंग झोन

ठळक मुद्देरामनगर-रावणवाडी ठाण्यांचे बांधकाम : आमदार अग्रवाल यांची अधीक्षकांसोबत बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील बेशीस्त पार्किंग व्यवस्था, पोलीस कर्मचाºयांसाठी क्वाटर्स व रावणवाडी तसेच रामनगर पोलीस ठाण्यांच्या बांधकामाच्या विषयाला घेऊन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीत आमदार अग्रवाल यांनी मांडलेल्या विषयांवर चर्चा घडून त्यावर लगेच कारवाईचा निर्णय घेण्यात आला.
शहरात पार्किंगची व्यवस्था नसल्याने शहरवासीयांना होत असलेली अडचण बघता आमदार अग्रवाल यांनी पार्किंगचा विषय बैठकीत मांडला. यावर नगरसेवक शकील मंसूरी यांनी अग्रसेन गेट ते गोंिदया गॅस एजंसी, सुभाष शाळेचे मैदान, शहर पोलीस ठाण्यामागील पार्किंगसाठीची आरक्षित जागा, बाजारातील दिल्ली होटल ते दुर्गा चौक पर्यंतची गल्लीची सफाई करून पार्कींगची व्यवस्था करता येणार असल्याचे सांगितले. यावर पोलीस अधीक्षक भुजबळ यांनी अतिक्रमण तोडून शहरातील रस्ते रूंद करण्या बाबत नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील यांना माहिती मागीतली.
यानंतर आमदार अग्रवाल यांनी रावणवाडी व रामनगर पोलीस ठाण्यांचा विषय मांडला. याप्रसंगी अधीक्षक भुजबळ यांनी, रावणवाडी येथे ठाण्यासाठी वन विभागाची जागा असून वन विभागाकडून काहीच कारवाई होत नसल्याचे सांगीतले. तर रामनगर शाळेसमोरील मैदान रामनगर पोलीस ठाण्यासाठी आरक्षीत त्याच्या हस्तांतरणासाठी नगर परिषदेकडून काहीच प्रयत्न होत नसल्याचे सांगीतले. यावर आमदार अग्रवाल यांनी वन अधिकारी युवराज यांच्याशी फोनवर चर्चा करून रावणवाडी येथील जागा पोलीस विभागाला आठवड्यात हस्तांतरीत करण्याचे निर्देश दिले. तर रामनगर पोलीस ठाण्यासाठीही आठवड्यात जागा उपलब्ध करवून देण्याचे आश्वासन मुख्याधिकारी पाटील यांनी दिले. शिवाय मनोहर चौक स्थित पोलीस लाईनच्या जागेवर १५० पोलीस क्वाटर्स तयार करण्यावर चर्चा या बैठकीत झाली. याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी पोलीस महासंचालकांसोबत झालेल्या बैठकीची माहिती दिली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, कार्यकारी अभियंता चव्हाण व पोलीस विभागाचे वास्तूवीद यांनी इमारतींचे नकाशे ठेवले असता त्यांचे अवलोकन करून त्यावर चर्चा करण्यात आली.
बाजार समिती व पांढराबोडीत पोलीस चौकी
या बैठकीत आमदार अग्रवाल यांनी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण यांना बाजार समितीच्या यार्डात पोलीस चौकीसाठी मंजूर १५ लाख रूपयांच्या निधीतून पोलीस चौकीचे काम त्वरीत सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच पांढराबोडी येथे पोलीस चौकीचा प्रस्ताव तयार करण्यास सांगीतले. विशेष म्हणजे पार्कीगच्या समस्येवर तोडगा म्हणून उड्डाणपूला खालील जागेत पार्कींग क्षेत्र बनविण्याचा सल्ला देत आमदार अग्रवाल यांनी या संदर्भात लवकरच नगर परिषदेकडून निविदा बोलाविण्यास सांगीतले.

बैठकीला उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा नगर रचनाकार दीपक वºहाडे, पोलीस उप अधीक्षक (गृह) दिपाली खन्ना, उप अधीक्षक भूमी अभिलेख सतीश पवार, पोलीस निरीक्षक मनोहर दाभाडे, रामनगरचे निरीक्षक संजय देशमुख, रावणवाडीचे सचीन सांडभोर, कॉंग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष अशोक चौधरी, अ‍ॅड. योगेश अग्रवाल, जहीर अहमद यांच्यासह अन्य अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: Parking zone to be built in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.