दीड हजार लोकवस्तीच्या गोंडीटोला गावात आजही अनेकांना घरकुलाची प्रतीक्षा आहे. गावातील अनेकजण मोलमजुरी तसेच शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. गावातील मोलमजुरी करणारे नागरिक कला राऊत, अनिल राऊत, कुवरलाल राऊत, सुनील राऊत, अज्ञान कोहले, मेहकर नेवारे यांचे आ ...
गेल्या ३-४ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू होती. त्यामुले सर्वत्र पाणिच पाणी झाले असून याच पावसामुळे ६ किमी. अंतरावरील नवेगावबांध तलावाचे पाणि लाल झाले आहे. खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा नळ योजनेत नवेगावबांध तलावाचे पाणी घेतले जाते. मात्र पाणी गढूळ ये ...
ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट होण्यास सुरूवात झाली असून दररोज निघत असलेले रूग्ण बघता आरोग्य विभागाचे प्रयत्न कमी पडत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे, शहरातील बाजारातील गर्दी बघता नागरिकांकडून सुरक्षेच्या उपा ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सकांनी चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा. सर्व व्हेंटीलेटर्स चालू स्थितीत असावेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जास्तीतजास्त अॅँटीजन चाचण्या कराव्यात. मृत्यू दर वाढणार नाही य ...
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोळा घरीच साजरा करून बैलांना पोळ्यात घेवून जाऊ नका आणि बैलांची पूजा घरीच करायची आहे. या आदेशाने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरवर्षी जून व जुलै महिन्यात रोवणीचे काम आटोपून श्रावण महिन्याच्या शेवटी पोळा मोठ्या थाटात शेतकरी स ...
मान्सूनच्या सुरूवातीचा जून व जुलै महिना कोरडा-कोरडाच गेला. त्यामुळे जिल्ह्यात सुरूवातीपासून पावसाची तूट दिसून येत होती. मात्र मागील २-३ दिवस जिल्ह्यात सर्वदूर बरसलेल्या संततधार पावसामुळे काही तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली होती. शिवाय या संत ...
आदिवासी बहूल, नक्षल प्रभावित जिल्ह्यातील जनता आधीच आर्थिक संकटात आहे. त्यात अनेक शासकीय रूग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून अनेक अद्ययावत सोयी सुविधा नसल्याने त्यांच्या समस्येत आणखी भर पडत आहे. या सर्वसोयी शासकीय रू ...
निवेदनात, १० ते १२ वर्षात पदोन्नती होणे अभिप्रेत आहे. परंतु त्याऐवजी कालबद्ध स्वरूपात आर्थिक पदोन्नती दिली जात आहे. कालबद्ध पदोन्नती घेतल्यावरही एकस्तर वेतन निश्चिती करणे व नक्षलग्रस्त भागातून निघाले नसल्यामुळे देय करणे तर्कसंगत असल्याचे म्हटले आहे. ...
१ ते १४ ऑगस्ट दरम्यान गोंदिया जिल्ह्यात ५०० हून अधिक कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. शुक्रवारी (दि.१४) आणखी ३७ कोरोना बाधितांची भर पडल्याने कोरोना रुग्णांचा आकडा २९० वर पोहचला आहे. ...
गोंदिया शहरात चार ते पाच ठिकाणी क्वारंटाईन आणि कोविड केअर स्थापन करण्यात आले आहे. बुधवारी (दि.१२) सायंकाळी गोंदिया फुलचूर येथील तंत्रनिकेत विद्यालयाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल नागरिकांना शिळे व निकृष्ट दर्जाचे जेवण देण्यात आले. त्यामुळे येथील नाग ...