कोरोनाला प्रतिबंध लावण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरत असल्याने कोरोना आता जिल्ह्यात ऑऊट ऑफ कंट्रोल झाल्याचे चित्र आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक ११९३ कोरोना बाधितांची नोंद झाली होती. तर ९ सप्टेंबरपर्यंत १११७ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. या महिन्यातील आण ...
एका शिक्षिकेने या आदर्श शिक्षक पुरस्कारावर आक्षेप घेत दुजाभाव करुन देण्यात आल्याचा आरोप केला होता. लोकमतने बुधवारच्या अंकात पुरस्कार वितरणावर आरोपाचे सावट या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर शिक्षण विभागाने कोविडच्या प्रादुर्भावामुळे गु ...
जिल्ह्यात आतापर्यंत ८२ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात ९ अधिकारी तर ७३ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने नक्षलवाद्यांशी लढा देण्यासाठी भारत बटालियन उभारण्यात आली. परंतु ही भारत बटालीयन नागपूरला कार्यरत आहे. गों ...
जिल्ह्यात २७ मार्चला पहिला कोरोना बाधित रूग्ण आढळला होता. त्यानंतर जवळपास दीड महिना एकही कोरोना बाधिताची नोंद झाली नव्हती. तर मार्च ते जुलै या पाच महिन्याच्या कालावधीत २८८ कोरोना बाधित आढळले. तर ऑगस्ट महिन्यात ११९३ कोरोना बाधितांची नोंद झाली. त्यामुळ ...
रूग्णालयात सेवा देणारे फक्त तीन डॉक्टर असताना कोविड रूग्णांचा भार त्यांच्यावरच टाकण्यात आला. त्या ठिकाणी कोविड रूग्णालय उभारायचे होते तर त्यासाठी कोविडचा काम करणारे पुरेसे प्रसूतीतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ नियुक्त करणे गरजेचे होते. परंतु कोविड गर्भवतींसाठी एक ...
जिल्हाधिकाऱ्यांना मागील दोन दिवसांपासून सर्दी आणि थोडा खोकला असल्याने सोमवारी त्यांनी मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाची टेस्ट करुन घेतली. मंगळवारी त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या होम आयसोलेटेड झाल्या आहेत. मागील सहा महिन्यां ...
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कोरोना बाधितांचा आकडा एक हजार पार झाला आहे. तर आठ दिवसात १४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात कोरोना बाधितांच्या आकड्याचा नवीन विक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना बाधितांसह ...
आधीच तज्ज्ञ डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून येथील कारभार हाताळला जात आहे. त्यामुळे येथील डॉक्टर व नर्सेसवर अतिरिक्त ताण येणे हे स्वाभावीकच आहे. परंतु असे असतानाही येथील तालुका वैद्यकीय अधिकारी व तहस ...
गर्भवती असलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह आली की तिच्यावर उपचार केला जात नाही. अधिक पैसे मोजून खासगी रूग्णालयातही तिची प्रसूती करण्याचा मानस असला तरी चक्क प्रसूतीला नकार दिला जातो. मात्र या सर्व प्रकाराकडे जिल्हा प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे ...
गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सप्टेंबरमध्ये देखील चांगलाच वाढतांना दिसत आहे.आज तीन रुग्णांचा मृत्यू झाला.१२१ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले तर ३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.४७० अहवालाची प्रतीक्षा आहे. ...