नवेगावबांध पर्यटनस्थळाची ओळख देशपातळीवर होईल अशा पद्धतीने हा भाग विकसीत करण्यात येईल. केवळ राज्यातीलच नव्हे तर देशभरातील पर्यटक येथे यावे, या दृष्टीकोनातून सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. ...
सालेकसा तालुक्यातील मक्काटोला ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत रोजगार सेवक गौतम शहारे यांनी बोगस मजूर दाखवून मनरेगामध्ये भ्रष्टाचार केल्याची तक्रार गावकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. ...
पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते शनिवारी (दि.२०) येथील तहसील कार्यालयात तालुक्यातील कटंगी मध्यम प्रकल्पातील वन विभागाच्या अखत्यारितील वन जमिनीसाठी ५८ भूधारकांना सानुग्रह अनुदान धनादेशाचे वाटप करण्यात आले. ...
तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात शून्य ते १० वर्षे वयोगटातील बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात विशेष शिबिर घेण्यात आले. यात सहा बालकांच्या हृदयाला छिद्र असल्याचे निदान झाले. ...
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय निर्मितीत अव्वल असलेल्या जिल्ह्यातील ८ शाळांची राज्यस्तरीय स्वच्छता विद्यालय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यापैकी सात शाळांना फाईव्ह तर एका शाळेला फोर स्टार मिळाला आहे. तर ३० शाळा सब कॅटेगिरीत आहेत. ...
शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील बोडीच्या सौंदर्यीकरणाचे काम नगर परिषदेने पुन्हा सुरू केले आहे. मात्र बोडीच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले असून हे अतिक्रमण अगोदर काढा व त्यानंतरच बोडीच्या सौंदर्यीकरणाचे काम करा..... ...
केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाच्या योजनेतून राज्यात चालविण्यात येणारे राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प मागील २० वर्षांपासून शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेल्या बालकामगारांच्या पुनर्वसनाचे कार्य करीत आहे. ...
जिल्ह्यात १८ जानेवारीपासून असलेला अनुसूचित जमाती कल्याण समितीचा तीन दिवसीय दौरा पार पडला. आमदार डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेत १५ आमदार व अधिकाऱ्यांच्या समितीने जिल्ह्याचा दौरा केला. ...