शहरात विविध कंपन्यांचे पन्नासावर एटीएम आहेत. मात्र रविवारी (दि.४) जवळपास सर्वच एटीएममध्ये नो कॅशचे फलक लागले होते. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी एटीएममध्ये तुटवडा निर्माण झाल्याने पुढील तीन चार दिवस काय असा प्रश्न ग्राहकांसमोर निर्माण झाला आहे. ...
रजेगाव-काटी व तेढवा- शिवनी उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांत सिंचनाची सुविधा पोहचली आहे. यातूनच मागील वर्षी दुष्काळी स्थितीतही चारगाव, सिरपूर व खातीया आदि गावांत पीक निघाले. ...
विदर्भात मोहफुलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मोहापासून विविध पदार्थ तयार केले जातात. दरम्यान मोहापासून तयार केलेल्या लाडूची मोठी मागणी आहे. ...
यंदा परतीच्या पावसाने दगा दिल्याने खरीपासह रब्बी हंगाम सुध्दा अडचणीत आला आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात सुध्दा मोजकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे रब्बीसाठी सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळण्याची शक्यता कमी असून रब्बीच्या लागवड क्षेत्र २५ हजार हेक्टर ...
आमगाव तालुक्याच्या जंगलीटोला घाटटेमणी येथील भोजराज देवलाल पटले (५०) यांच्या घरी २५ आॅक्टोबरच्या रात्री ११ वाजता दरोडा टाकून ४ लाख २ हजाराचा माल पळवून नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या चार सदस्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २ नोव्हेंबरला अटक केली ...
येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी रोहिणी बांधकर यांनी डिजिटल हस्ताक्षर प्रमाणपत्र कार्यालयातून गमाविल्याने मनरेगा कुशल कामाची रक्कम अडली असल्याचा प्रकार समोर आला आहे. परिणामी कामाचे बिल मिळाले नसल्याने लाभार्थ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. या ...
व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लुट होऊ नये, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळाला पाहिजे या उद्देशाने शेतकऱ्यांचे हित सर्वोतोपरी डोळ्यासमोर ठेऊन शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु केले आहेत. ...
राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असताना शिक्षणापासून कुणीही वंचीत राहू नये यासाठी पुढाकार घेणाऱ्या खाजगी शिक्षण संस्थांना बंद पाडण्याचा घाट शासन रचत आहे. शासनाच्या या धोरणाचा निषेध नोंदवित जिल्हा शैक्षणिक संस्थांच्या संचालक मंडळाने शुक्रवारी (दि.२) एक दि ...
कुपोषणाच्या समस्येने त्रस्त आदिवासी व नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्याची सुटका होणार आहे. अंगणवाडीत आतापर्यंत स्प्रींग बॅलेंस वजन काट्याचा उपयोग केला जात होता. या वजन काट्यातील चुकांमुळे कुपोषित बालकांचा मृत्यू होत होती. ...
भारत हा कृषीप्रधान देश असून ६० टक्के नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. विविध भागात विविध प्रकारचे पीक घेतले जातात. विविध पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना पोशिंदा म्हटले जाते. त्याला सोबती म्हणून सतत बैलजोडी असायची. ...