कोटजांभूरा येथे धानाचे पुंजणे जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 06:00 AM2019-12-08T06:00:00+5:302019-12-08T06:00:19+5:30

आठ दिवसांपुर्वीच चिचगड सहा गावातील ५० हून अधिक शेतकऱ्यांचे ८० पेक्षा अधिक धानाचे पुंजणे अज्ञात इसमांनी जाळले. त्यानंतर पुन्हा १३ शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे जाळण्यात आले. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र यानंतरही धानाचे पुंजणे जाळण्याचा प्रकार सुरूच असल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Paddy burnt at Kotjambura | कोटजांभूरा येथे धानाचे पुंजणे जाळले

कोटजांभूरा येथे धानाचे पुंजणे जाळले

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । पुंजणे जाळण्याचा प्रकार सुरुच,चिचगड परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
चिचगड : देवरी तालुक्यातील धानाचे पुंजणे जाळण्याचा प्रकार काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी (दि.६) रात्रीच्या सुमारास धानाचे पुंजणे जाळल्याची घटना घडली.चिचगड परिसरातील कोटजांभूरा येथील तीन शेतकऱ्यांच्या शेतातील धानाचे पुंजणे काही अज्ञात इसमानी जाळले. यात शेतकऱ्यांचे १ लाख ७२ हजार रुपयांचे नुकसान केले. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मागील काही दिवसांपासून चिचगड परिसरातील गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील धानाच्या पुंजण्यांना आगी लावून नुकसान करण्याचा प्रकार घडत आहेत.आठ दिवसांपुर्वीच चिचगड सहा गावातील ५० हून अधिक शेतकऱ्यांचे ८० पेक्षा अधिक धानाचे पुंजणे अज्ञात इसमांनी जाळले. त्यानंतर पुन्हा १३ शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे जाळण्यात आले. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र यानंतरही धानाचे पुंजणे जाळण्याचा प्रकार सुरूच असल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिणामी काही शेतकऱ्यांनी शेतावर जागल करणे सुरू केले आहे. आधीच निसर्गाचा फटका सहन करीत असलेल्या शेतकऱ्यांवर या प्रकारामुळे पुन्हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना आणखी दारिद्रयाच्या खाईत लोटण्याचे महापाप काही समाजकंटकाकडून होत असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
शुक्रवारी कोटजांभूरा येथील किसन चनाप,फगन बागडेहरिया आणि भिकाम जुडा या आदिवासी शेतकºयांच्या धानाच्या पुंजण्यांना अज्ञात इसमाने आग लावल्याने यात १ लाख ७१ हजार ७३२ रुपयांचा नुकसान झाले. यामुळे सदर शेतकºयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
शेतकºयांनी या घटनेची माहिती तलाठ्याला दिली. तलाठ्याने नुकसानीचे पंचनामे करुन शासनाला अहवाल सादर केला आहे. त्यात २ हेक्टर ६० आर क्षेत्रातील भातिपकाचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना शासनाने त्वरीत आर्थिक मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

धानाचे पुंजणे जाळण्याचा हेतू काय
चिचगड परिसरातीलच गावांमध्ये मागील काही दिवसांपासून शेतकºयांचे शेतातील धानाचे पुंजणे जाळण्याचा प्रकार सुरू आहे.अद्यापही पुंजणे जाळण्याचा प्रकार सुरूच असल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. रक्ताचे पाणी करुन मोठ्या कष्टाने पीक घेतल्यानंतर त्याची राखरांगोळी केली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. तर धानाचे पुंजणे जाळण्यामागील नेमका हेतू काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पोलिसांसमोर आव्हान कायम
शेतातील धानाचे पुंजणे जाळण्याचा प्रकार सुरुच असून अद्यापही या प्रकरणातील आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आले नाही. तर पुंजणे जाळण्याचा प्रकार सुरूच असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. जोपर्यंत या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या जीव मात्र टांगणीला लागला आहे.

Web Title: Paddy burnt at Kotjambura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.