गोंदिया जिल्ह्यात धानाचे पुंजणे जाळले; अज्ञात इसमाचे कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 10:07 IST2019-11-27T10:07:05+5:302019-11-27T10:07:33+5:30
देवरी तालुक्यातील चिचगड परिसरात बुधवारी पहाटे धानाचे पुंजणे अज्ञात इसमाने जाळल्याची घटना घडली.

गोंदिया जिल्ह्यात धानाचे पुंजणे जाळले; अज्ञात इसमाचे कृत्य
ठळक मुद्देलाखोंचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया- देवरी तालुक्यातील चिचगड परिसरात बुधवारी पहाटे धानाचे पुंजणे अज्ञात इसमाने जाळल्याची घटना घडली. यात शेतकऱ्यांचे १५ ते २० लाखांचे नुकसान झाले आहे. सकाळी या घटनेची माहिती होताच शेतकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत ५० हून अधिक पुंजणे जळून खाक झाले होते. या घटनेने शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान तर झालेच पण ते कर्जबाजारी होण्याचीही शक्यता वाढली. यासंदर्भात पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.