कोरोटे यांनी घेतला विकास कामांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 05:00 IST2020-01-09T05:00:00+5:302020-01-09T05:00:23+5:30
आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयात आ.सहषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोरोटे यांनी सर्व विभागांकडून विकास कामांचा आढावा घेतला.

कोरोटे यांनी घेतला विकास कामांचा आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयात आ.सहषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोरोटे यांनी सर्व विभागांकडून विकास कामांचा आढावा घेतला.
बैठकीला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे, अप्पर तहसीलदार निवृत्ती उईके,नायब तहसीलदार ओमकार ठाकरे, बी.टी.यावलकर, देवरी तालुका कृषी अधिकारी तोडसाम, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे, देवरी तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप भाटीया, माजी तालुकाध्यक्ष राधेशाम बगडीया, माजी सभापती वसंत पुराम, तालुका महासचिव बळीराम काटेवार, तालुका उपाध्यक्ष चैनसिंग मडावी, डॉ. अनिल चौरागडे, भैयालाल चांदेवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश ताराम, तालुका राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष सी.के.बिसेन, माजी नगराध्यक्ष सुमन बिसेन, माजी उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके यांच्यासह पंचायत समिती, आरोग्य विभाग, वन विभाग, आदिवासी विकास प्रकल्प, आदिवासी विकास महामंडळ, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग, विद्युत विभाग, पोलीस विभाग, नगर पंचायत आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सर्व शासकीय आणि निमशासकीय विभागतील अधिकाऱ्यांकडून विकास कामाचा आढावा आ.कोरोटे यांनी घेतला. शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेची कामे प्राधान्याने करुन त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. प्रलबिंत असलेल्या विकास कामांना गती देऊन ही कामे त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश दिले.
विकास कामे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कामाकडे दुर्लक्ष करणे खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही कोरोटे यांनी बैठकीत दिला. संचालन नायब तहसीलदार ओकांर ठाकरे यांनी केले तर आभार तहसीलदार विजय बोरुडे यांनी मानले.