दायित्वाची भावना विकसित होण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 22:08 IST2017-12-30T22:03:47+5:302017-12-30T22:08:04+5:30
वार्षिकोत्सवाचा उद्देश जेथे विद्यार्थ्यांत आत्मसंयम, समन्वय, विद्यालयाच्या प्रगतीत सहकार्य व पालकांशी संपर्क साधून त्यांना पाल्यांची माहिती प्रदान करणे असतो. तेथेच वार्षिकोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा प्रदर्शीत करता येत असतानाच दायीत्वाची भावना विकसीत होण्याची संधी मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.

दायित्वाची भावना विकसित होण्याची संधी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वार्षिकोत्सवाचा उद्देश जेथे विद्यार्थ्यांत आत्मसंयम, समन्वय, विद्यालयाच्या प्रगतीत सहकार्य व पालकांशी संपर्क साधून त्यांना पाल्यांची माहिती प्रदान करणे असतो. तेथेच वार्षिकोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा प्रदर्शीत करता येत असतानाच दायीत्वाची भावना विकसीत होण्याची संधी मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
येथील महावीर मारवाडी स्कूल सोसायटीच्यावतीने संचालीत श्री महावीर मारवाडी नटखट, रामकुवर इंदरचंद अग्रवाल, राजस्थान इंग्लीश प्रायमरी स्कूल, राजस्थान इंग्लीश हायस्कूल, राजस्थान कनिष्ठ महाविद्यालय, मारवाडी प्रायमरी स्कूल, शांतीदेवी अग्रवाल मारवाडी हायस्कूल, आनंदीदेवी अग्रवाल प्रायमरी स्कूल, हिरादेवी राधेशाम मारवाडी कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने आयोजीत वार्षिकोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्ष अशोक इंगळे, जुगलकिशोर अग्रवाल, अॅड. रतनलाल अग्रवाल, त्रिवेणीप्रसाद अग्रवाल मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संचालन डोंगरे व पल्लवी दरोडे यांनी केले. आभार अभिषेक अग्रवाल यांनी मानले. कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष सिताराम अग्रवाल, उपाध्यक्ष किरण मुंदडा, पवन अग्रवाल, सचिव प्रकाश कोठारी, सहसचिव श्रीनिवास मुंदडा, कोषाध्यक्ष वेदप्रकाश गोयल, गणेश इसरका, पंकज चोपडा, अजय अग्रवाल, अपूर्व अग्रवाल, राजकुमार तिवारी, सुरेंद्र अग्रवाल, जगदीश अग्रवाल, मुकेश अग्रवाल, अजिंक्य इंगळे, मुजीब पठाण, अशोक शर्मा यांच्यासह शाळांतील मुख्याध्यापक, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.