शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबातील एकालाच मिळणार 'पीएम किसान' योजनेचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 15:50 IST

लाभार्थ्यांची संख्या होणार कमी : केंद्र सरकारचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे. त्याअंतर्गत एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी आता या योजनेसाठी अर्ज करताना पती, पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर वारसा हक्कवगळता ज्या शेतकऱ्यांनी सन २०१९ पूर्वी जमीन खरेदी केली आहे. त्या शेतकऱ्यांना व डॉक्टर, इंजिनिअर आहेत जे आयकर भरतात, जे पेन्शनर आहेत, त्यांना यापुढे पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.

शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा, या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेंतर्गत ६ हजार रुपये देण्याचे जाहीर केले. त्यानुसार या योजनेची सुरुवात डिसेंबर २०१८मध्ये करण्यात आली. तेव्हापासून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देण्यात येत आहेत. गोंदिया जिल्ह्यात दीड लाखांच्यावर शेतकरी लाभार्थी आहेत. या योजनेमुळे शेतकऱ्यांची चांगली आर्थिक सोय झाली आहे. ज्यावेळी ही योजना सुरू झाली, त्यावेळी एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी यांनी त्यांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीच्या अनुषंगाने पीएम किसान योजनेसाठी अर्ज केले होते. त्यानुसार त्यांना या योजनेचा लाभ सुरू करण्यात आला.

पीएम किसानचे पैसे कधी येणार ? पीएम किसान योजनेचा १८वा हप्ता महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आला होता. हप्ता जाहीर होऊन जवळपास तीन महिने होत आहेत. १९व्या हप्त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. केंद्र सरकार पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १९वा हप्ता जारी करू शकते. मात्र, सरकारने हप्त्याचे पैसे हस्तांतरीत करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

वारंवार केवायसी कशासाठी शेतकरी पीएम किसानसाठी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज भरतात. त्यांना या योजनेचा लाभही मिळतो. मात्र, काही हप्ते मिळाल्यावर पुन्हा शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी सांगितले जाते. एकदा आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांचीच ती कागदपत्रे असूनही वारंवार ई- केवायसी करायला का सांगितली जाते, हा प्रश्न शेतकऱ्यांतून विचारला जात आहे.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाgondiya-acगोंदिया