शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

१२०० लोकांमागे केवळ एक आरोग्य कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 05:00 IST

कोरोनाच्या काळात जोमाने काम करणारे आरोग्य कर्मचारी कोरोना योध्दा होऊन काम करीत आहेत. परंतु कोरोना संदर्भात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन वा प्रशासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात सोय-सुविधा देण्यात येत नाही. तरी रूग्ण सेवा ही ईश्वर सेवा समजूनच आरोग्य कर्मचारी काम करीत आहेत. गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त असल्याने या जिल्ह्यातील लोक आरोग्यसंदर्भात आधी खूपच उदासिन होते.

ठळक मुद्देअपुऱ्या मनुष्यबळाने आरोग्य यंत्रणाच आजारी : निधीचाही अभाव, पैशाअभावी औषधांचा पुरवठाही नाही, रुग्णांची गैरसोय मात्र कायम

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सर्वात उत्तम धन म्हणून आरोग्य धन संबोधले जाते.परंतु आरोग्याची काळजी घेणारेच रूग्णालय आजारी पडत आहेत. प्रत्येक ठिकाणी मनुष्यबळाचा अभाव दिसून येतो. कोरोना सारख्या महारामारीच्या काळातही मनुष्यबळाचा व औषधांचा तुटवडा रूग्णालयात दिसून येत आहे. उपलब्ध असलेल्या मनुष्यबळात काम करणे अत्यंत कठीण होत आहे.तरीही कोरोनाच्या काळात जोमाने काम करणारे आरोग्य कर्मचारी कोरोना योध्दा होऊन काम करीत आहेत. परंतु कोरोना संदर्भात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन वा प्रशासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात सोय-सुविधा देण्यात येत नाही. तरी रूग्ण सेवा ही ईश्वर सेवा समजूनच आरोग्य कर्मचारी काम करीत आहेत. गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त असल्याने या जिल्ह्यातील लोक आरोग्यसंदर्भात आधी खूपच उदासिन होते. परंतु आता आरोग्यासंदर्भात जनजागृती होऊ लागल्याने प्रत्येक गर्भवतीची प्रसूती ही आरोग्य संस्थेतच केली जाते. बालमृत्यू व माता मृत्यूवर आळा घालण्यासाठी आरोग्य प्रशासनाचा भर असतो. गर्भावस्थेत महिलांची काळजी घेतली जात नसल्याने जन्माला येणारी बालके हे कुपोषित असतात. गर्भवती महिला गर्भावस्थेतील दिवस वांगी, भात, कडी, चटणी यावरच आजही काढतात. त्यांना गर्भावस्थेत संतुलीत आहार दिला जात नसल्याने कमी वजनाची बालके जन्माला येतात. काही तर व्यंगत्व घेऊन जन्माला येतात. परिणामी फुलण्यापूर्वीच ह्या कळ्या कोमेजतात. डॉक्टरांची कमरतरता, परिचारीका, आरोग्य सेवक व सर्वच प्रकारचे आरोग्य विभागातील कर्मचारी कमी आहेत. परंतु तुटपुंज्या कर्मचाऱ्यांतही आपल्या जनतेचे आरोग्य कसे जपायचे याचेच मनन आरोग्य कर्मचारी करीत आहेत. गोंदिया जिल्ह्यात १२०० लोकांमागे एक आरोग्य कर्मचारी आहे. तुटपुंज्या कर्मचाऱ्यांमुळे आरोग्य कर्मचाºयांवर कामाचा मोठा ताण आहे. यासाठी नागरिकांनीही त्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करणे अपेक्षीत आहे.

टॅग्स :Healthआरोग्य