१२०० लोकांमागे केवळ एक आरोग्य कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 05:00 IST2020-07-31T05:00:00+5:302020-07-31T05:00:29+5:30

कोरोनाच्या काळात जोमाने काम करणारे आरोग्य कर्मचारी कोरोना योध्दा होऊन काम करीत आहेत. परंतु कोरोना संदर्भात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन वा प्रशासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात सोय-सुविधा देण्यात येत नाही. तरी रूग्ण सेवा ही ईश्वर सेवा समजूनच आरोग्य कर्मचारी काम करीत आहेत. गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त असल्याने या जिल्ह्यातील लोक आरोग्यसंदर्भात आधी खूपच उदासिन होते.

Only one health worker for every 1,200 people | १२०० लोकांमागे केवळ एक आरोग्य कर्मचारी

१२०० लोकांमागे केवळ एक आरोग्य कर्मचारी

ठळक मुद्देअपुऱ्या मनुष्यबळाने आरोग्य यंत्रणाच आजारी : निधीचाही अभाव, पैशाअभावी औषधांचा पुरवठाही नाही, रुग्णांची गैरसोय मात्र कायम

नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सर्वात उत्तम धन म्हणून आरोग्य धन संबोधले जाते.परंतु आरोग्याची काळजी घेणारेच रूग्णालय आजारी पडत आहेत. प्रत्येक ठिकाणी मनुष्यबळाचा अभाव दिसून येतो. कोरोना सारख्या महारामारीच्या काळातही मनुष्यबळाचा व औषधांचा तुटवडा रूग्णालयात दिसून येत आहे. उपलब्ध असलेल्या मनुष्यबळात काम करणे अत्यंत कठीण होत आहे.
तरीही कोरोनाच्या काळात जोमाने काम करणारे आरोग्य कर्मचारी कोरोना योध्दा होऊन काम करीत आहेत. परंतु कोरोना संदर्भात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन वा प्रशासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात सोय-सुविधा देण्यात येत नाही. तरी रूग्ण सेवा ही ईश्वर सेवा समजूनच आरोग्य कर्मचारी काम करीत आहेत. गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त असल्याने या जिल्ह्यातील लोक आरोग्यसंदर्भात आधी खूपच उदासिन होते. परंतु आता आरोग्यासंदर्भात जनजागृती होऊ लागल्याने प्रत्येक गर्भवतीची प्रसूती ही आरोग्य संस्थेतच केली जाते. बालमृत्यू व माता मृत्यूवर आळा घालण्यासाठी आरोग्य प्रशासनाचा भर असतो. गर्भावस्थेत महिलांची काळजी घेतली जात नसल्याने जन्माला येणारी बालके हे कुपोषित असतात. गर्भवती महिला गर्भावस्थेतील दिवस वांगी, भात, कडी, चटणी यावरच आजही काढतात. त्यांना गर्भावस्थेत संतुलीत आहार दिला जात नसल्याने कमी वजनाची बालके जन्माला येतात. काही तर व्यंगत्व घेऊन जन्माला येतात. परिणामी फुलण्यापूर्वीच ह्या कळ्या कोमेजतात. डॉक्टरांची कमरतरता, परिचारीका, आरोग्य सेवक व सर्वच प्रकारचे आरोग्य विभागातील कर्मचारी कमी आहेत. परंतु तुटपुंज्या कर्मचाऱ्यांतही आपल्या जनतेचे आरोग्य कसे जपायचे याचेच मनन आरोग्य कर्मचारी करीत आहेत. गोंदिया जिल्ह्यात १२०० लोकांमागे एक आरोग्य कर्मचारी आहे. तुटपुंज्या कर्मचाऱ्यांमुळे आरोग्य कर्मचाºयांवर कामाचा मोठा ताण आहे. यासाठी नागरिकांनीही त्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करणे अपेक्षीत आहे.

Web Title: Only one health worker for every 1,200 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य