शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

आरटीईच्या ९०३ प्रवेशासाठी झाली ऑनलाईन सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 6:00 AM

हजारो पालक आपल्या पाल्यांना या २५ टक्के प्रवेशात क्रमांक लागावा यासाठी धडपडत आहेत. ११ ते २८ फेब्रुवारी या दरम्यान जिल्ह्यात ९०३ जागेसाठी ३ हजार ६५८ अर्ज करण्यात आले आहेत. २५ टक्के मोफत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी ११ ते २९ फेब्रुवारी २०२० या दरम्यान पालकांनी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन नोंदणी केली आहे.

ठळक मुद्देआज दुपारनंतर पालकांना मॅसेज : कोरोनामुळे ३१ मार्चनंतरच होणार व्हेरीफिकेशन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी ११ ते २९ फेब्रुवारी या १९ दिवसात पुढच्या वर्षासाठी अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. यात गोंदिया जिल्ह्यातील ९०३ जागांसाठी ३ हजार ६५८ अर्ज आले आहेत. त्या मोफत प्रवेशाची सोडत आॅनलाईन पध्दतीने १७ मार्च रोजी काढण्यात आली.हजारो पालक आपल्या पाल्यांना या २५ टक्के प्रवेशात क्रमांक लागावा यासाठी धडपडत आहेत. ११ ते २८ फेब्रुवारी या दरम्यान जिल्ह्यात ९०३ जागेसाठी ३ हजार ६५८ अर्ज करण्यात आले आहेत. २५ टक्के मोफत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी ११ ते २९ फेब्रुवारी २०२० या दरम्यान पालकांनी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्या अर्जाची सोडत १७ मार्च रोजी ऑनलाईन पध्दतीने झाली.जिल्ह्यातील १४० शाळांनी यासाठी नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश मिळणार आहे. आमगाव तालुक्यातील ११ शाळांमध्ये ८७ जागेसाठी ४०६ अर्ज आले आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १३ शाळांमधील ९१ जागेसाठी २४५ अर्ज, देवरी तालुक्यातील १० शाळांमधील ५५ जागेसाठी १६१ अर्ज, गोंदिया तालुक्यातील ५७ शाळांमधील ३५६ जागेसाठी १ हजार ८२६ अर्ज करण्यात आले आहेत.गोरेगाव तालुक्यातील १५ शाळांमधील ७४ जागेसाठी २९८ अर्ज, सडक-अर्जुनी तालुक्यातील १० शाळांमधील ४५ जागेसाठी १४५ अर्ज, सालेकसा तालुक्यातील ५ शाळांमधील ४४ जागेसाठी ११८ अर्ज, तिरोडा तालुक्यातील १९ शाळांमधील १५१ जागेसाठी ४५९ अर्ज करण्यात आले आहेत. एकूण १४० शाळांमधील ९०३ जागेसाठी ३ हजार ६५८ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यांची लॉटरी आॅनलाईन पध्दतीने काढण्यात आली.गुरुवारी (दि.१९) रोजी दुपारनंतर ज्या पाल्यांचे नंबर लागले त्यांच्या पालकांच्या मोबाईलवर दुपारनंतर मॅसेज जाणार आहेत. पोर्टलवर लिस्ट सुध्दा टाकली जाणार आहे. त्यात प्रतीक्षा यादी देखील सोबतच लावली जाणार आहे.कागदपत्रांचे व्हेरिफीकेशन ३१ मार्चनंतरपालकांनी सोडतीच्या एसएमएस वरच अवलंबून राहू नये. गुरूवारी दुपारनंतर अप्लीकेशनवर जाऊन सविस्तर माहिती घ्यावी. आपल्या पाल्यांला लॉटरी लागली की नाही हे पाहावे.ज्यांना लॉटरी लागली त्यांनी संबधीत शाळेत जाऊन कागदपत्रांची पडताळणी लगेच करायची असते. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने आरटीईच्या कागदपत्रांची पडताळणी ३१ मार्चनंतरच संबधीत शाळांत करण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Educationशिक्षण