दोन मोटारसायकलची आमोरासमोर धडक १ ठार, दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST2019-10-29T05:00:00+5:302019-10-29T05:00:12+5:30

दोन मोटारसायकल वेगात असल्याने दोघांची आमोरासमोर धडक झाली. यात दोन्ही मोटारसायकल स्वार तीन जण जखमी झाले. दरम्यान अदानी वीज प्रकल्पाजवळील नागरिकांना जखमींना तिरोडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र हेमराज पटले याला डॉक्टरांनी मृत घोषीत केले.

One killed in motorcycle accident | दोन मोटारसायकलची आमोरासमोर धडक १ ठार, दोन गंभीर

दोन मोटारसायकलची आमोरासमोर धडक १ ठार, दोन गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : दोन मोटारसायकलची आमोरासमोर धडक झाल्याने १ ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.२८) दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास गोंदिया तिरोडा मार्गावरील अदानी वीज प्रकल्पाच्या गेट क्रमांक १ समोर घडली. हेमराज पटले (२२) रा. सेजगाव असे अपघातात ठार झालेल्या मोटारसायकल चालकाचे नाव आहे. तर प्रवीण महेंद्र गोटे (२१) व साहिल शिशुपाल राऊत (१७) रा.निमगाव इंदोरा असे अपघात गंभीर जखमी असलेल्यांची नाव आहे.
गंभीर जखमींना गोंदिया येथील केटीएस रुग्णालयात दाखल केले. प्राप्त माहितीनुसार एक मोटारसायकल गोंदियाकडून तिरोडाकडे तर दुसरी तिरोड्याहून गोंदियाच्या दिशेने जात होती.
दोन मोटारसायकल वेगात असल्याने दोघांची आमोरासमोर धडक झाली. यात दोन्ही मोटारसायकल स्वार तीन जण जखमी झाले. दरम्यान अदानी वीज प्रकल्पाजवळील नागरिकांना जखमींना तिरोडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र हेमराज पटले याला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. तर प्रवीण आणि साहिलवर प्राथमिक उपचार करुन त्यांना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले. या घटनेची नोंद तिरोडा पोलिसांनी केली आहे.

Web Title: One killed in motorcycle accident

टॅग्स :Accidentअपघात