ट्रॅक्टर अपघातात एक ठार, पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 05:00 IST2021-06-14T05:00:00+5:302021-06-14T05:00:18+5:30

चालक योगेश ढोरे हा वडसाच्या दिशेने ट्रॅक्टर (क्र. एमएच ३४ एल १५७७) घेऊन जात होता. ग्राम खामखुराजवळील वळणावर ट्रक्टर आला असता ढोरे याचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या खाली उलटला. यात ढोरे याला जबर मार लागून तो जागीच ठार झाला. जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून, मृताचे शवविच्छेदन करून घटनेची नोंद अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

One killed, five injured in tractor accident | ट्रॅक्टर अपघातात एक ठार, पाच जखमी

ट्रॅक्टर अपघातात एक ठार, पाच जखमी

ठळक मुद्देखामखुरा वळणावरील घटना : चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव: चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर उलटल्याची घटना शनिवारी (दि.१२) रात्री १० वाजेच्या सुमारास वडसा -कोहमारा राज्यमार्गावरील ग्राम खामखुराजवळ घडली. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रॅक्टरमध्ये बसलेले पाच जण जखमी झाले. योगेश डाकराम ढोरे (४२, रा.कुरूड, गडचिरोली) असे मृत चालकाचे नाव आहे. 
चालक योगेश ढोरे हा वडसाच्या दिशेने ट्रॅक्टर (क्र. एमएच ३४ एल १५७७) घेऊन जात होता. ग्राम खामखुराजवळील वळणावर ट्रक्टर आला असता ढोरे याचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या खाली उलटला. यात ढोरे याला जबर मार लागून तो जागीच ठार झाला. 
तर ट्रॅक्टरमध्ये बसलेले घनश्याम सिबू कचरे (४३), राजू चरणलाल वर्मा (४५), चंद्रशेखर महादेवराव कबोडे (४५), मनीष चंद्रशेखर खोब्रागडे (३५, सर्व रा. गोंदिया) व ग्यानबा महादेव पारधी (५०,रा. कुरुड)  हे गंभीर जखमी झाले. जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून, मृताचे शवविच्छेदन करून घटनेची नोंद अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
फिर्यादी दुर्योधन मधुकर पिलारे (३५,रा. कुरुड) यांच्या तक्रारीवरून पोलिसांत अपराध क्रमांक १४०-२०२१ कलम २७९, ३३७, ३०४ भादंवि सहकलम १८४ मोवाका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 ठाणेदार महादेव तोदले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक चंद्रकांत भोयर व पोलीस नायक प्रशांत बोरकर अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title: One killed, five injured in tractor accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.