शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! कोरोनामुळे झाला बहिण भावाच्या नात्यात दुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:00 IST

भारतीय संस्कृतीतील ही काही क्षणांची ऐतिहासिक परंपरा बालपणापासूनच एक भाऊ आणि प्रिय बहिण यांना एका निरागस बंधनांमध्ये घट्ट बांधून ठेवते.आणि त्यांचे हे नाते अतूट आणि परमपवित्र मानले जाते.परंतु यंदा सर्व जग कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडल्याने सोशल डिस्टन्सिंगमुळे कोरोनाच्या रूपाने बहिण भावाच्या अतूट नात्यात दुरावा निर्माण केल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देरक्षाबंधन सणावर कोरोनाचे सावट : ऑनलाईन होणार भावा-बहिणींची भेट

संजयकुमार बंगळे ।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : श्रावणी पौर्णिमा अर्थात बहिण भावाच्या नात्यातील एक अतूट बंधन म्हणजे रक्षाबंधन! या दिवशी प्रत्येक बहिणीच्या मनात आपल्या प्रिय भावाबद्दल शुभकामना व शुभ भावना यांचा जणू सागरच उसळत असतो. भारतीय संस्कृतीतील ही काही क्षणांची ऐतिहासिक परंपरा बालपणापासूनच एक भाऊ आणि प्रिय बहिण यांना एका निरागस बंधनांमध्ये घट्ट बांधून ठेवते.आणि त्यांचे हे नाते अतूट आणि परमपवित्र मानले जाते.परंतु यंदा सर्व जग कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडल्याने सोशल डिस्टन्सिंगमुळे कोरोनाच्या रूपाने बहिण भावाच्या अतूट नात्यात दुरावा निर्माण केल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.रक्षाबंधन या सणाची भाऊ आणि बहिण आतुरतेने वाट बघत असतात. लग्न झालेली दूरवर राहणारी बहिण आपल्या भावाच्या मनगटावर प्रेमाचा हा रेशमी धागा बांधण्यासाठी माहेरी जाते व राखी बांधून आपले भगिनी प्रेमाचे कर्तव्य निभावते मात्र कोरोनाच्या परिस्थितीने सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. गावी जायचे म्हटले तर बसेस, रेल्वे सर्व सुविधा बंद आहे. लॉकडाऊन असल्याने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायला फार मोठे प्रवास नियमाचे सोपस्कार पार पाडावे लागतात. शिवाय कोरोनाच्या संसर्गाने राखी पोहोचती करण्यासाठी असणारे पोस्ट आॅफिस सेवा, कुरिअर सेवा सुरू आहेत.अथवा संसर्गामुळे कुरिअर घेण्यास नकार देत आहेत. त्यामुळे राखी पाठवावी कशी बिकट प्रश्न बहिणीसमोर निर्माण झाला आहे. याचा परिणाम राखी विक्र ेत्यांवर झाला आहे. भावाच्या मनगटावर बहिणीने राखी बांधल्यानंतर तिला मिळणाºया रिटर्न गिफ्ट पासूनही वंचित राहावे लागणार आहे.बहिण जी पवित्र राखी आपल्या भावाच्या मनगटावर बांधते त्या रंगीत रेशमी धाग्यामध्ये बहिणीचा आपल्या भावाला एक अबोल निरोप असतो की, दादा आज तुझी ही बहिण या आशेने राखी बांधत आहे की, भविष्यात जेव्हा मला तुझी गरज भासेल तेव्हा याच दणकट हातांनी तु मला मदत करशील. माझे रक्षण करण्यास समर्थ असशील.हा रेशमी धागा मना मनांना एकत्र घट्ट बांधून ठेवणार आहे. रक्षाबंधन सणावर कोरोनाचे सावट असल्याने यावर्षी बहिणीला व्हाट्सअप, ऑनलाईन किंवा व्हिडिओकॉलद्वारेच भावाचे दर्शन घेऊन संवाद साधता येणार आहे.कोरोनामुळे म्हणावेसे वाटते, अरे देवा! कोरोनामुळे झाला बहिण भावाच्या नात्यात दुरावा!

टॅग्स :Socialसामाजिक