शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
4
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
5
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
6
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
7
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
8
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
9
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
10
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
11
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
12
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
13
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
14
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
15
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
16
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
17
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
18
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
19
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
20
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

जिल्ह्यात ७ दिवसात वाढले ४२.३५ टक्के रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 5:00 AM

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सुरूवातीला प्रभावीपणे उपयायोजना राबविण्यात आल्या. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात होता. मात्र त्यात थोडी शिथिलता दिल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा कोरोनाच्या संसर्गात वाढ झाल्याचे चित्र आहे. २३ जुलैपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचा परिस्थिती नियंत्रणात होती. तेव्हा कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्के होता.

ठळक मुद्दे६४ गावात कोरोनाचा संसर्ग : रुग्ण बरे होण्याचा दर चांगला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जून आणि जुलै महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे चित्र होते. त्यामुळे जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू होती. पण आॅगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला. त्यामुळे ७ दिवसात ४२.३५ टक्के रुग्ण वाढल्याने प्रशासन सुध्दा चिंततेत पडल्याचे चित्र आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सुरूवातीला प्रभावीपणे उपयायोजना राबविण्यात आल्या. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात होता. मात्र त्यात थोडी शिथिलता दिल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा कोरोनाच्या संसर्गात वाढ झाल्याचे चित्र आहे. २३ जुलैपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचा परिस्थिती नियंत्रणात होती. तेव्हा कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्के होता. तर कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या १८ होती. त्यामुळे जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे दिलासादायक चित्र होते.मात्र ३१ जुलैनंतर कोरोना बाधितांच्या आकड्यात सातत्याने वाढ झाली. मार्च ते जुलै दरम्यान जिल्ह्यात एकाच दिवशी सर्वाधिक २७ कोरोना बाधितांची नोंद २१ मे रोजी झाली होती. तर ३१ जुलै रोजी १४ कोरोना बाधितांची नोंद झाली. ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासूनच या आकड्यात वाढ झाली.१ ऑगस्ट रोजी ३३, २ ऑगस्टला सर्वाधिक ६०, ३ ऑगस्ट २२, ४ ऑगस्ट २, ५ ऑगस्ट ५२, ६ ऑगस्ट रोजी २२ कोरोना बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे यातील सर्वाधिक रुग्ण हे गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून यावर प्रतिबंध लावण्यात जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग अपयशी ठरल्याचे चित्र आहे. मात्र कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ८९.६० टक्के असून ही निश्चितच दिलासादायक बाब आहे.जिल्ह्यात ६४ कंटेन्मेंट झोनजिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कंटन्मेंट झोनमध्ये सुध्दा वाढ झाली आहे. जिल्ह्यात सध्या स्थितीत ६४ कंटेन्मेंट झोन आहेत. यात चांदनीटोला, कुडवा, गोंदिया शहरातील यादव चौक, सिव्हिल लाईन, रेल्वे लाईन, श्रीनगर, सिंधी कॉलनी, सालेकसा तालुक्यातील भजेपार, पाऊलदौना, रामाटोला, सितेपार, देवरी तालुक्यातील आकरीटोला, भागी, परसटोला, गरवारटोला, नवाटोला, देवरी शहरातील वॉर्ड क्रमांक ५,८,९,१०, सडक अर्जुनी तालुक्यातील हलबीटोला, डव्वा, पाटेकुर्रा, गोरेगांव तालुक्यातील घोटी, तिरोडा तालुक्यातील वडेगाव, मुंडीकोटा, सतोना, लाखेगाव, माल्ही, लोणार, खैरबोडी, गुमाधावडा, वडेगाव-२, गोंडमोहाडी, पाटीलटोला, इसापूर, सेजगाव, पालडोंगरी, पिपरिया, उमरी, पांजरा, घोगरा, सरांडी, मुंडीकोटा रेल्वे स्टेशन, मलपुरी, तिरोडा शहरातील न्यू सुभाष वॉर्ड, किल्ला वॉर्ड, नेहरू वॉर्ड, गुरूदेव वॉर्ड, महात्मा गांधी वॉर्ड, रवींद्र वॉर्ड, लक्ष्मी वॉर्ड, महात्मा फुले वॉर्ड, न्यू बेलाटी खुर्द, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी, सिंगलटोली, ताडगाव, वडेगाव, खाडीपार, रेंगेपार आणि आमगाव तालुक्यातील तिगाव, चिरचाडबांध आदी गावांचा समावेश आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या