शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
4
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
5
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
6
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
7
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
8
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
9
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
10
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
11
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
12
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
13
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
14
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
15
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
16
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
17
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
18
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
19
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
20
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

करबुडव्यांविरूद्ध न.प. आक्रमक

By admin | Updated: January 28, 2015 23:35 IST

कर वसुली मोहीम दिवसेंदिवस जोर पकडत असताना नगर परिषदेच्या कर वसुली पथकाने कर न भरल्याप्रकरणी सिव्हील लाईन्स परिसरातील एक दुकान सील केले. कदाचीत नगर

गोंदिया : कर वसुली मोहीम दिवसेंदिवस जोर पकडत असताना नगर परिषदेच्या कर वसुली पथकाने कर न भरल्याप्रकरणी सिव्हील लाईन्स परिसरातील एक दुकान सील केले. कदाचीत नगर परिषदेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असावी. मात्र या घटनेमुळे शहरात पालिकेच्या या कठोर कारवाईचे चांगलेच कौतुक केले जात आहे. दुसरीकडे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे. परिणामी कर वसुलीच्या रकमेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वादविवाद व हमरीतुमरीपासून नगर परिषदेच्या कर वसुली मोहिमेला सुरूवात झाली आहे. मात्र यंदा नगर परिषदेने कर वसुलीसाठी कंबर कसली असून वाटेत येत असलेली अडसर बाजूला सारून मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्या नेतृत्वात पथक मैदानात उतरले आहे. कर वसुलीच्या या मोहिमेंतर्गत मंगळवारी (दि.२७) पथकाने सिव्हील लाईन्स स्थित हर्षा मेठी मंदिरासमोरील प्रमोद शुक्ला यांच्या घरी धडक दिली. कमलाबाई शुक्ला यांच्या नावाने असलेल्या मालमत्तेचे सन १९९३ पासूनचे सुमारे एक लाख १८ हजार रूपयांचे कर थकून आहे. याबाबत कर विभागाने त्यांना नोटीस बजावून त्यानंतर जप्ती आदेश बजावले मात्र कर न भरल्यामुळे मोरे यांनी चर्चा केली. मात्र तोडगा न निघाल्याने पथकाने नाईलाजास्तव नगर परिषद अधिनियम १९६५ कलम १५२ अंतर्गत त्यांच्या दुकानाला सील ठोकले. नगर परिषदेच्या इतिहासात दुकानाला सील ठोकण्यात आल्याची व पालिकेने एवढे कठोर पाऊल उचलल्याची ही अलिकडची पहिलीच घटना आहे. परिषदेच्या या कारवाईचे कौतुक केले जात असून या घटनेमुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. कर वसुलीला प्रतिसाद लाभत आहे. परिणामी कर वसुलीचा आकडा वाढतच चालला असून शुक्रवारी (दि.२८) पथकाने ४.५० लाख रूपये रोख वसूल केले. (शहर प्रतिनिधी)