शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

आता वणव्यावर नियंत्रण शक्य

By admin | Updated: April 9, 2016 01:56 IST

जंगलात एका ठिकाणी लागलेली आग वनव्याचे रुप धारण करीत शेकडो हेक्टर जंगलाला घेरुन टाकते आणि लाखमोलाची वनसंपत्ती नष्ट होते.

सालेकसात मशीनचा यशस्वी प्रयोग : आग विझवणारी व थांबविणारी ब्लोअर मशीन ठरणार वरदान विजय मानकर सालेकसाजंगलात एका ठिकाणी लागलेली आग वनव्याचे रुप धारण करीत शेकडो हेक्टर जंगलाला घेरुन टाकते आणि लाखमोलाची वनसंपत्ती नष्ट होते. एवढेच नाही तर वनसंपती व वन्यजीवांच्या जीवासही धोका निर्माण होतो. त्यामुळे उन्हाळ्यात लागणारे हे वनवे वनविभागासाठी एक चिंतेची बाब ठरत होती. परंतु या वनव्यांना नियंत्रित ठेवण्यासाठी आता वन विभागाने प्रत्येक बीटवर एक ब्लोअर मशीनची सोय केली आहे. सालेकसा येथील जंगलात या मशिनचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे.सालेकसा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वनसंपत्ती लाभलेली आहे. येथील वनात विविध जातींचे, बहुउपयोगी लाकूड देणारे वृक्ष, विविध औषधीयुक्त वृक्ष व औषधीय गुणांनी भरपूर असे असंख्य प्रकारचे फळे, फुले व पाने उपलब्ध असणारे जंगल या तालुक्यात पाहायला मिळते. आजही जंगल परिसरात राहणारे आदिवासी समाजाचे लोक वनातून मिळणाऱ्या नैसर्गिक साधनांवरच आश्रित आहेत. परंतु हेच वन जेव्हा वनव्याच्या आहारी जाते तेव्हा लाखमोलाची वनसंपत्ती नष्ट तर होतेच, त्याचबरोबर वनांवर आश्रित असलेल्या लोकांच्या आणि वन्यजीवांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे वनव्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी वनविभागाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या, परंतु शासनाला व वनविभागाला यात पूर्णपणे यश आले नाही. त्यातच अनेक वेळा या आगींसाठी वनकर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा आणि नागरिकांचे असहकार्य जास्त कारणीभूत ठरले.जंगलाला आग लागण्यापासून वाचविण्यासाठी किंवा छोट्या आगीमुळे निर्माण झालेल्या वनव्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोअर मशीनचा उपयोग व प्रयोग सुलभ आणि यशस्वी ठरत आहे. ब्लोअर मशीनच्या उपयोगाने तालुक्यातील जंगलांना वाचविण्यात निश्चित यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सालेकसा विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी सदानंद अवगान यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, या तालुक्यात एकूण २७ बीट असून प्रत्येक बीटला एक ब्लोअर मशीन देण्यात येत आहे. आतापर्यंत अतिआवश्यक असलेल्या १७ बीटवर ब्लोअर मशीनची व्यवस्था झालेली आहे. केव्हाही कुठेही जंगलात आग लागल्यास संबंधित बीटरक्षक त्या ब्लोअर मशीनचा उपयोग करुन वनव्यावर नियंत्रण मिळवू शकतो. तसेच ती आगसुद्धा विझवू शकतो.