आता जिल्ह्याच्या सीमेवर गुरुजींचा पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 05:00 AM2020-05-17T05:00:00+5:302020-05-17T05:00:32+5:30

मुक्तपणे संचार करणाºया मानवाला चार भिंतीच्या आत स्वत:ला बंद करुन घ्यावे लागत आहे. तर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानरुपी अमृत देऊन त्यांचे उज्वल भविष्य घडविणाºया शिक्षकांना कधी पहारा देण्याची वेळ येणार असे भविष्य कदाचित कुणीही केले नसेल. मात्र कोरोनामुळे ही वेळ आणली आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असून लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केली आहे.

Now Guruji's guard at the district boundary | आता जिल्ह्याच्या सीमेवर गुरुजींचा पहारा

आता जिल्ह्याच्या सीमेवर गुरुजींचा पहारा

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिकांच्या सुरक्षेची जवाबदारी । कोरोना योद्धा म्हणून नियुक्ती

राजीव फुंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : ज्ञानाच्या मंदिरात उद्याचे उज्वल भविष्य आणि विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात. मात्र आता या शिक्षकांवर उज्वल भविष्य घडविण्यासह देशातील नागरिकांची सुरक्षा करण्याची सुध्दा जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्हा सीमेला लागून असलेल्या मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर पोलीस, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आता शिक्षकांची सुध्दा कोरोना योध्दा म्हणून रात्र पाळीत नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता जिल्ह्याच्या सीमेवर गुरूजींचा पहारा असल्याचे चित्र आहे.
कोरोनाने अख्या जगाचे चित्र बदलून टाकले आहे. कोरोनामुळे अनेक गोष्टी प्रथमच जगात घडत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कोरोनामुळेच माणसा माणसामध्ये फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्याची वेळ आली आहे.
मुक्तपणे संचार करणाºया मानवाला चार भिंतीच्या आत स्वत:ला बंद करुन घ्यावे लागत आहे. तर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानरुपी अमृत देऊन त्यांचे उज्वल भविष्य घडविणाºया शिक्षकांना कधी पहारा देण्याची वेळ येणार असे भविष्य कदाचित कुणीही केले नसेल. मात्र कोरोनामुळे ही वेळ आणली आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असून लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केली आहे.
गोंदिया जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण नसल्याने जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. त्यामुळे शेवटपर्यंत जिल्हा ग्रीन झोनमध्येच राहावा, जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे.
आमगाव तालुक्याला मध्यप्रदेश राज्याची सीमा लागून आहे. त्यामुळे मध्यप्रदेशातून जिल्ह्यात ये-जा करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी सीमेवर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आणि जि.प.शाळेतील शिक्षकांची कोरोना योध्दा म्हणून रात्रीच्या वेळेस या ठिकाणी नियुक्ती केली आहे. यासाठी आमगाव तालुक्यातील ५० शिक्षकांची निवड करण्यात आली असल्याची माहिती आहे.
दररोज चार ते पाच शिक्षकांची नियुक्ती मध्यप्रदेशच्या सीमेवर येते. शिक्षकांवर ये-जा करणाºया प्रवासी आणि वाहनांची नोंद करण्याचे काम सोपविण्यात आले आहे. तालुक्यातील लांजी मार्गावर आणि मुंडीपार सालेकसा मार्गालगत एक कक्ष देखील तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी सुध्दा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने शिक्षकांवर सोपविलेली जवाबदारी ते तेवढ्याच प्रामाणिकपणे कुठलाही संकोच न बाळगता पूर्ण करीत आहेत.

Web Title: Now Guruji's guard at the district boundary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.