निसर्गाच्या चक्रव्यूहात सापडला जगाचा पोशिंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:00 IST2020-07-29T05:00:00+5:302020-07-29T05:00:40+5:30

जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी रोहीणी, मृग, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजाला पाणी विकत घेवून तर काही ठिकाणी इंजिन व मोटारपंपाच्या सहाय्याने पऱ्हे जगविण्याची वेळ आली. काही ठिकाणी रोवणी झाली आहे परंतु पुन्हा पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहे. अनेक ठिकाणी पीके करपण्याच्या मार्गावर असून येत्या काही दिवसात पाऊस न आल्यास दुष्काळ पडण्याची शक्यता आहे.

The nourishment of the world found in the maze of nature | निसर्गाच्या चक्रव्यूहात सापडला जगाचा पोशिंदा

निसर्गाच्या चक्रव्यूहात सापडला जगाचा पोशिंदा

ठळक मुद्देपावसाकडे लागल्या सर्वांच्या नजरा : अद्यापही सर्वत्र दमदार पावसाची प्रतीक्षा कायम

प्रकाश हातेल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिचाळ : खरीप हंगामाला सुरुवात झाली असली तरी अद्यापही दमदार पावसाअभावी अनेक ठिकाणी रोवणी झालेली दिसून येत नाही. पावसाने उघडीप दिल्याने बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरवर्षी शेतकरी खरीप हंगामात नव्या जोमाने तयारीला लागतो. तसाच यावर्षीही बळीराजाने बँकेचे कर्ज तसेच उसनवार करुन खरीप हंगामाची जुळवाजुळव केली. मात्र गत महिन्याभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. त्यामुळे शेतकरी उलटा संकटात सापडला आहे.
जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी रोहीणी, मृग, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजाला पाणी विकत घेवून तर काही ठिकाणी इंजिन व मोटारपंपाच्या सहाय्याने पऱ्हे जगविण्याची वेळ आली. काही ठिकाणी रोवणी झाली आहे परंतु पुन्हा पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहे. अनेक ठिकाणी पीके करपण्याच्या मार्गावर असून येत्या काही दिवसात पाऊस न आल्यास दुष्काळ पडण्याची शक्यता आहे.
गत वर्षाच्या तोटा भरुन निघेल या आशेने अनेकांनी मिळेल तिथून कर्ज घेतले. मात्र ऐन खरीप हंगामातच पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांची धास्ती वाढली आहे. काही ठिकाणी पाणी आहे पण वीज नाही, अशी अवस्था असल्याने गोसे प्रकल्पाच्या पाण्याशेजारी शेतकऱ्यांनी कालव्यातील पाणी उपसून रोवणी केली. मात्र गत आठवड्याभरापासून पावासाने दडी मारल्याने रोवणी करुन देखील पीके करपण्याच्या मार्गावर आहे. बळीराजाने केलेला खर्च निघेल की नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे. कर्जमुक्त होण्याचे स्वप्न बळीराजाच्या नशिबिच नाही काय? असे चित्र दिसत आहे.
चिचाळ, गोसे, अड्याळ, नेरला, कोंढा, सोमनाळा परिसरातील शेतकरी पावसाअभावी चिंताग्रस्त झाले आहे. परिवाराच्या पालनपोषणासाठी अनेकांना रोजगाराची चिंता सतावू लागली आहे. नकारात्मक विचार येत असल्याने शासनाच्या मदतीची गरज आहे. देशाची अर्थव्यवस्था शेती व्यवसायामुळे सुधारु लागली असतानाच आता पावसाचे संकट उभे राहिल्याने बळीराजाला सरकारने आर्थिक मदत देण्याची गरज आहे. कोरोना प्रादूर्भाव वाढत असल्याने अनेकांनी आपल्या गावाची वाट धरली आहे. त्यामुळे अनेकजन शेती करु लागले आहेत. त्यामुळे कुटुंबाला हातभार लागणारा रोजगारही बंद पडल्याने आता शेती व्यवसायावरच पुर्ण भिस्त आहे. शेतकऱ्यांना शासनाने दिलासा देण्यासाठी येत्या काही दिवसात पाऊस न पडल्यास रोजगार उपलब्ध करण्याची गरज आहे.

शेतकऱ्यांना कोणी वालीच उरला नाही
शेतकऱ्यांसाठी निवडणुकीपूर्वी विविध आंदोलने, मोर्चे काढणारे पुढारी आता गायब झाल्याचे दिसून येत आहे. बळीराजावर संकट ओढावले असताना आता मदतीसाठी कुणीही पुढाकार घेत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पावसासोबत पुढाऱ्यांनीही दडी मारली काय? अशी चर्चा शेतकऱ्यांतून होत आहे. गोसे प्रकल्पावर डावा कालव्याचे पाणी सोडा म्हणून शेतकऱ्यांनी हल्लाबोल केला. पाण्यासाठी शेतकऱ्यांना आजही संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कायमस्वरुपी संकटातून मुक्त करण्यासाठी विविध योजना राबविण्याची गरज आहे.

Web Title: The nourishment of the world found in the maze of nature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.