शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

२३ वर्ष लोटूनही धरणापासून सिंचन होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 21:48 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा बेवारटोला सिंचन प्रकल्प २३ वर्ष लोटूनही अद्यापही पूर्ण झाला नाही. परिणामी या प्रकल्पावर करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च सुध्दा व्यर्थ ठरत आहे. तर तालुक्यातील शेतकरी सुध्दा सिंचनापासून वंचित आहेत.

ठळक मुद्देबेवारटोला प्रकल्प अर्धवटच : हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित, प्रशासनाचे वेळकाढू धोरण

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा बेवारटोला सिंचन प्रकल्प २३ वर्ष लोटूनही अद्यापही पूर्ण झाला नाही. परिणामी या प्रकल्पावर करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च सुध्दा व्यर्थ ठरत आहे. तर तालुक्यातील शेतकरी सुध्दा सिंचनापासून वंचित आहेत.दीर्घ काळानंतर १९९५ मध्ये महाराष्ट्रात सत्तापालट होऊन प्रथमच भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन झाले होते. तत्कालीन पाटबंधारे मंत्री महादेवराव शिवणकर यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यात अनेक सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली. त्यात सालेकसा तालुक्याच्या बेवारटोला गावाजवळ मध्यम सिंचन प्रकल्प स्थापित करुन दरेकसा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला सुजलाम सुफलाम करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला. बेवारटोला प्रकल्पाला १ जानेवारी १९९६ ला मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली. यानंतर काही दिवसांनी या प्रकल्पाचे विधिवत भूमिपूजन करण्यात आले. प्रकल्पासाठी त्या वेळी ८७९.५५ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले होते. या प्रकल्पाचे भूमिपूजन करताना सदर सिंचन प्रकल्प तीन वर्षात पूर्ण होऊन दरेकसा परिसरातील शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळू शकेल अशी ग्वाही दिली होती. त्यामुळे आदिवासी भागातील शेतकºयांच्या मनात त्यावेळी मोठ्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. कामालाही वेगाने सुरुवात झाली होती. बेवारटोला आणि नवाटोला ही दोन गावे या धरणाच्या बुडीत क्षेत्रात आल्याने २३६ लोकांच्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेला सुध्दा सुरुवात झाली होती. ६४ कुटुंबाचे विचारपूर गावाजवळ स्थलांतरण करुन पुनर्वसन करण्यात आले. परंतु प्रकल्प निर्मितीला सुरुवात झाल्यानंतर म्हणजे १९९६ पासून आजपर्यंत जवळपास २३ वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटून ही शेतकºयांना सिंचनाची सुविधा प्राप्त झाली नाही.विद्यमान सरकारचेही वेळकाढू धोरणमागील पाच वर्षापासून राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असून खासदार आमदार सुद्धा भाजपचे आहे. गल्ली ते दिल्लीपर्यंत भाजपचे शासन असून सुद्धा हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने कोणतीच पाऊले उचलण्यात आले नाही. त्यामुळे मागील २३ वर्षांपासून शेतकरी सिंचनापासून वंचित आहे.रेल्वेच्या मंजुरीचा अडसरबेवारटोला जलाशयाचे काम ८० ते ९० टक्के पर्यंत पूर्ण झाले. जलसाठा संग्रहित होऊ लागला.परंतु पाण्याचे वितरण करणारे मुख्य दोन्ही कालवे अद्यापही अर्धवट आहेत.डावा कालवा काही प्रमाणात तयार झाला असला तरी उजवा कालवा चांदसूरज गावाजवळ रेल्वेच्या मंजुरीअभावी रखडला आहे.आघाडी शासनाचेही दुर्लक्ष१९९९ पर्यंत धरणाचे व कालव्याचे काम तर पूर्ण झालेच नाही. परंतु पाच वर्ष युतीचे शासन गेले आणि त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रावादी काँग्रेसचे आघाडीचे शासन आले. सतत १५ वर्ष काँग्रेस-राष्ट्रावादी काँग्रेसचे सरकार राहून या दरम्यान या क्षेत्रात आमदार सुद्धा बदलत गेले. कधी भाजप तर कधी काँग्रेसला संधी मिळाली.परंतु बेवारटोला प्रकल्पाची तांत्रिक अडचण दूर करुन धरणाचे काम पूर्ण करीत कालव्याच्या निर्मितीचे अडचण दूर करण्याचे काम झाले नाही.परिणामी शेतकरी सिंचनापासून वंचित राहिले.

टॅग्स :Waterपाणी