सापांच्या सान्निध्यात काढतात रात्र
By Admin | Updated: July 5, 2014 00:58 IST2014-07-05T00:58:32+5:302014-07-05T00:58:32+5:30
वर्षाची झळी, हिवाळ्याचा गारवा व उन्हाळ्याची भिषणता सोसून जीवनाचा गाडा रेटणाऱ्या या मेंढपाळांना सर्वाधिक त्रास पावसाळ्यात सहन करावे लागते.

सापांच्या सान्निध्यात काढतात रात्र
नरेश रहिले गोंदिया
वर्षाची झळी, हिवाळ्याचा गारवा व उन्हाळ्याची भिषणता सोसून जीवनाचा गाडा रेटणाऱ्या या मेंढपाळांना सर्वाधिक त्रास पावसाळ्यात सहन करावे लागते. पावसाळ्यात साप व विंचवांसोबत रात्र घालवावे लागते. मनुष्याच्या जन्माला आलेल्या या मेंढपाळांना जनावरांसारखे बाहेरच आयुष्य घालवावे लागते.
ते हिवाळ्यातील थंडीने गारठतात, उन्हाळ्याच्या उष्णतेने भाजून निघतात व पावसात साप विंचवाच्या सानिध्यात राहतांना त्यांना विविध आजारांना बळी पडावे लागते. जंगलाच्छादीत भागात ते वास्तव्यास राहात त्यामुळे त्यांना मलेरिया, डेंग्यू या आजारांना बळी पडावे लागते. या डेऱ्यातील प्रत्येकाला मलेरिया व डेंग्यूची लागण होते. सुरक्षा म्हणून ते मच्छरदाण्या लावत असतात परंतु मच्छरदाण्यांनाही अनेक थिगळ राहात असल्याने त्यांना मलेरिया, डेंग्यूची लागण सहजरित्या होते.
तुटक्या खाटा, कमी उंचीच्या खाटा यावर आंथरून पांघरून ते करतात. त्यामुळे पावसाळ्यात सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका त्यांना नेहमीच सतावत असतो. दररोज त्यांच्याकडून मेहनत होत असल्याने त्यांचे शरीर धडधाकड बनते तरी देखील त्यांच्यावर आजार मात करते. गावात राहणारा व्यक्ती डासांचा प्रादुर्भाव झाला तर स्वत:च्या अस्वतेकडे दुर्लक्ष करून ग्राम पंचायत, नगरपालिका यांच्या नावाने बोंबा ठोकून डासनाशक फवारणीची मागणी करतात. परंतु यांना डासांचा जीवघेणा त्रास झाला तरी ते कुणाकडे तक्रार कणार? पावसात खाटेवर व्यक्ती झोपलेला असतो व खाली साप असतात असे चित्र अनेकदा या लोकांना पाहावयास मिळते. पावसाळ्याची सुरूवात साप व विंचवाच्या सानिध्यातूनच दरवर्षी या मेंढीपालन करणाऱ्यांना घालवावी लागते.
ऊन, वारा, पाऊस, थंडी उघड्यावर राहणाऱ्या मेंढपाळांना जीवनातील सर्व बाबी ईश्वरावर व नशिबावर टाकून जगावे लागते.