शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
4
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
5
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
7
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
8
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
9
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
10
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
11
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
12
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
13
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
14
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
15
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
16
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
17
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
18
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
19
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
20
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अन्न साखळीतील सजीव प्रदूषणाच्या विळख्यात

By admin | Updated: June 6, 2014 00:05 IST

उत्पादन वाढीसाठी घेतात मोठय़ा प्रमाणात केला जात असलेला रासायनिक खतांचा वापर, कारखान्यातील प्रदूषण, जलप्रदूषण, कीटकनाशकांची सततची फवारणी यामुळे पर्यावरण संतूलन साधणारे अन्न

गोंदिया : उत्पादन वाढीसाठी घेतात मोठय़ा प्रमाणात केला जात असलेला रासायनिक खतांचा वापर, कारखान्यातील प्रदूषण, जलप्रदूषण, कीटकनाशकांची सततची फवारणी यामुळे पर्यावरण संतूलन साधणारे अन्न साखळीतील सजीव प्रदूषणाच्या विळख्यात सापडले असून, नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याचा थेट परिणाम शेतकर्‍यांवर होणार असल्याने शेतकरी व पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.
निसर्गाचा समतोल पशूपक्षी, प्राणी, हवा पर्यावरण या प्रमुख घटकांवर अवलंबून आहे. मात्र माणूस नावाच्या प्राण्याने आपल्या फायद्यासाठी या प्रमुख घटकांवरच आघात करणे सुरु केले आहे.
जंगल साफ केले जात असतानाच प्राणी व पक्ष्यांचीही शिकार केली जात आहे. याला प्रदुषणाची जोड लाभल्याने अन्न साखळीतील अत्यंत महत्वाचे घटक आता नामशेष होत आहे. त्यामुळेच पावसाळ्यात शेतात दृष्टीस पडाणारा शेकर्‍यांचा मित्र गांडुळ दुर्मिळ होत आहे. जमिनीची नैसर्गिक मशागत करणार्‍या गांडुळामुळे पाण्याचा निचरा व्हायचा. थोडाफार पाऊस झाला तरी पाणी जमिनीत शोषल्या जात आहे. पण आज पाण्याचे जमिनीत शोषण न होता बरेच पाणी वाहून जात आहे. त्यामुळे जमिनीची धूप थांबत असून जमिनीतील उष्णतेचे प्रमाण कायम राहत आहे.
गांडुळासारखे असंख्य सूक्ष्मजीव सुद्धा प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याने दूष्परिणामाच्या गंभीरतेचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. किडीवर नियंत्रण ठेवणारे बेडूक व अन्नसाखळीतील महत्वाचा घटक साप यांचे अस्तित्व या मानवी कुरापतीमुळे धोक्यात आल्याने पिकांचा नाश करणारे उंदिर, घुसांचे प्रमाण सध्या शेतात वाढले आहेत. उंदराला मारण्याकरिता किटकनाशकांचा वापर केल्याने अन्य मदत करणारे जीव यांचे भक्ष्यस्थानी पडत आहे. नैसर्गिक अन्नसाखळीचे विस्कळीत झाल्याने अशा समस्यांशी शेतकर्‍यांना सामना करावा लागतो.
यावर माणसाने आता गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. असे न झाल्यास अन्न साखळीतील सजीव पूर्णपणे लोप पावतील व त्याचे दुष्परिणाम मानवजातीलाच भोगावे लागतील यात शंका नाही. याकरिता मानवाला अन्न साखळीतील या सजीवांच्या रक्षणासाठी धडपड करण्याची गरज निर्माण झाली आहे.