शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

संघटित समाज काळाची गरज

By admin | Updated: February 11, 2016 02:12 IST

समाज संघटित असल्याशिवाय कोणत्याही समाजाची प्रगती शक्य नाही. त्यामुळे सर्वांनी आपापसातले वाद दूर सारून समाजाला संघटित करा. हीच आता काळाची गरज आहे,

कटरे यांचे प्रतिपादन : तालुकास्तरीय रमाई जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमसालेकसा : समाज संघटित असल्याशिवाय कोणत्याही समाजाची प्रगती शक्य नाही. त्यामुळे सर्वांनी आपापसातले वाद दूर सारून समाजाला संघटित करा. हीच आता काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते व ओबीसी आघाडीचे अध्यक्ष बबलू कटरे यांनी केले. ते रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या तालुकास्तरीय कार्यक्रमात मार्गदर्शन करीत होते.नागार्जुन बुद्ध विहार समिती, रमाईनगर स्मारक समिती व महात्मा जोतिबा फुले स्मारक समिती आमगाव खुर्द (सालेकसा) यांच्या संयुक्त विद्यमाने महामाता रमाई आंबेडकर यांनी तालुकास्तरीय जयंती उत्सव समारंभ घेण्यात आला. त्यानिमित्त सकाळपासून रात्रीपर्यंत विविध कार्यक्रम घेण्यात आले. मुख्य जयंती समारंभाच्या अध्यक्षस्थानी बबलू कटरे होते. मार्गदर्शक म्हणून समाजसेविका प्रा. सविता बेदरकर होत्या. अतिथी म्हणून शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख क्षीरसागर, शिवसेनेचे तालुका प्रमुख कुलतारसिंग भाटिया, एसीड संस्थेचे संचालक राजकुमार रामटेके, आमगाव खुर्दचे सरपंच योगेश राऊत, सदस्य ब्रजभूषण बैस, रमाई स्मारक समितीचे अध्यक्ष शोभाराम शहारे, महात्मा फुले स्मारक समितीचे अध्यक्ष आनंद भास्कर, विजय मानकर व इतर मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी कटरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले घोषवाक्य ‘शिक्षित बना, संघटीत व्हा व संघर्ष करा’ या मूलमंत्राची आठवण करून दिली. त्याचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी कुलतारसिंग भाटिया, आर.ए. रामटेके यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.जयंती समारंभानिमित्त सकाळी सर्वप्रथम सालेकसाचे पोलीस निरीक्षक मोहन खांदारे, सामाजिक कार्यकर्ते व्यंकटी बंडीवार, सरपंच योगेश राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत धम्मध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर दुपारी ३ वाजतापर्यंत बौद्ध समाजाच्या वतीने रॅली काढून नगर भ्रमण करण्यात आले. सायंकाळी ४ वाजता नगरभोज करविण्यात आले. त्यानंतर राजेश बघेले यांच्या एव्हरग्रीन आर्केस्ट्राच्या माध्यामातून भीमगीतांचा गजर चालला. रमार्इंच्या जीवनावर आधारित अनेक गीतांनी संपूण सालेकसा नगर दणाणले.संचालन शालू साखरे यांनी केले. आभार निर्दोश साखरे यांनी मानले. रॅलीच्या नगरभ्रमणप्रसंगी राजकुमार रामटेके यांच्या वतीने अल्पोहार व शरबत वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी राहुल देऊळकर, हेमंत देऊळकर, सतीश करवाडे, विजय जांभूळकर, रमेश करवाडे, राजेश भास्कर, नवीन शहारे, कमलेश टेंभुर्णीकर, अजय साखरे, कैलाश गजभिये, भीमराव भास्कर, अनिल तिरपुडे, करवाडे, शहारे आदींनी सहकार्य केले.. (तालुका प्रतिनिधी)