शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

पक्षी वाचविणे ही काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 22:19 IST

सजीव सृष्टीतील पक्षी हा खूप महत्वाचा घटक आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पक्षी सिंहाची भूमिका बजावतात. दोन पंख व चोच म्हटले की, आपल्यासमोर पटकन पक्ष्यांची प्रतिमा नजरेसमोर दिसते.

ठळक मुद्देजैपाल ठाकूर : पक्ष्यांसाठी पाणपोई हा सर्वोत्तम उपाय

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : सजीव सृष्टीतील पक्षी हा खूप महत्वाचा घटक आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पक्षी सिंहाची भूमिका बजावतात. दोन पंख व चोच म्हटले की, आपल्यासमोर पटकन पक्ष्यांची प्रतिमा नजरेसमोर दिसते. परंतु हल्लीच्या काळात विकासाच्या नावावर वाढते औद्योगिकीकरण, जंगलतोड, जलप्रदूषण, शेतीत रासायनिक पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर, ध्वनिप्रदूषण, मोबाईल टॉवर, शिकारीचे वाढते प्रमाण, अधिवास नष्ट करते अशा विविध कारणांमुळे पक्षी जीवन धोक्यात आले आहे.मार्च महिना म्हटला की, हळूहळू तापमानात वाढ होताना दिसते. प्रत्येक गावात असलेले तलाव आटायला लागतात. त्यामुळे पक्ष्यांना पाणी मिळेनासे होते. पाण्याच्या शोधार्थ पक्षी मानवी वस्तीकडे धाव घेतात. परंतु सगळीकडेच रांजण, माठ व टाकीमध्ये पाणी झाकलेले असते आणि अशातच पाणी मिळेनासे होऊन पक्ष्यांचा मृत्यू होतो. जसजशी तापमानात वाढ होते, तसतसा माणूस हा बुद्धीमान प्राणी स्वत:साठी पंखे, कुलर, फ्रिज व ए.सी.यासारख्या साधनांचा वापर करुन बचाव करतो. परंतु निसर्गात संतुलन राखण्यासाठी अहोरात्र झटणाच्या पक्ष्यांकडे दुर्लक्ष केले जाते. पहाटे किलबिल करुन आनंदमय पहाट करण्यासाठी पक्षी गाणे गातो. निसर्गाची शोभा वाढवतो. शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांवरील परागी भवनाच्या प्रक्रियेत पक्षी महत्वाची भूमिका बजावतात. काही झाडांचे बिया झाल्यानंतर त्या बिया रुजून मोठ्या झाडांचे रुपांतर करण्यात पक्षी महत्वाचे कार्य करतात.अशा बहुपयोगी पक्ष्यांसाठी पाणपोई हा उपाय सर्वोत्तम असून बिनखर्चिक असल्याचे भजियापार येथील पक्षी मित्र जैपाल ठाकूर यांनी सांगितले आहे. प्रत्येक घराला लागून परसबाग असते. परसबागेत आंबा, फणस, जांभूळ, पेरू, शेवगा, चिकू, सिताफळ, संत्रा, नारळ, बदाम यासारखे विविध झाड असतात. याशिवाय फुलांची विविध झाडे असतात. अशा रमणीय वातावरणात चिमणी, दयाळ, सातभाई, शिंपी, बुलबुल, सूर्यपक्षी, सुभग, साळूंखी, कावळा यासारखे विविध पक्षी वावरतांना दिसतात. अशा पक्ष्यांसाठी घरच्या परसबागेत मोकळ्या जागेत व सावलीत पाणपोईची व्यवस्था केली तर निश्चितच पक्ष्यांसाठी आनंदाची पर्वणीच असेल. कुंभाराच्या येथून मातीचे पसरट भांडे पाण्यासाठी आपण वापरु शकतो. किंवा तुटलेले मडके, अर्धवट भागात पाणी राहील असे पसरट भांडे वापरु शकतो. पाणपोईसाठी मातीचेच भांडे वापरणे फायदेशीर असते. प्लास्टीक किंवा स्टीलचे भांडे वापरल्यास पाणी लवकर गरम होते. त्यामुळे पक्षी पाणी पित नाही. मातीचे भांडे वापरल्यास पाणी थंडगार पाण्याने आपली तहान भागवून दरदिवशी सकाळीच्या वेळेस आंघोळ करतो.घरच्या परसबागेत पाणपोईची जर व्यवस्था केली तर घरच्या घरी पक्षी निरीक्षण करण्याची संधी आपल्याला निर्माण होईल. विविध पक्षी पाहायला मिळतील, पक्ष्यांच्या विविध हालचाली, आवाज (ध्वनी), यांची माहिती होईल. पाण्यासोबतच शक्य असेल तर अन्नाचीही व्यवस्था आपण करु शकतो. एका भांड्यात गहू, बाजारी, ज्वारी, तांदूळ, शिळे अन्न यांची व्यवस्था करु शकतो.माणसाच्या स्वार्थीवृत्तीमुळे पक्ष्यांच्या अनेक जाती नष्ट झालेल्या आहेत. काही जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आपण वेळीच सावध झालो नाही तर पुढच्या पिढीला चित्राच्या माध्यमातून पक्ष्यांचे दर्शन होईल असे वाटते.