शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
2
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
3
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
4
किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
5
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
6
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
7
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
8
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
9
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
10
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
11
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
12
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
13
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
14
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
15
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
16
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
17
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या
18
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
19
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
20
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप

कृषी विकासासाठी मानसिकतेत बदल आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:03 IST

कृषी विकासाच्या बाबतीत गोंदिया जिल्हा अजूनही खूप मागे आहे. शेतकऱ्यांच्या पारंपरिक मानसिकतेमुळे शेतीचा विकास पाहिजे त्या गतीने होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकीकडे कृषी क्षेत्रात पीक पध्दतीमध्ये बदल व सुधार करण्यासाठी सर्व सामान्य शेतकºयांचा मानसिकतेत बदल घडवून आणणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देआधुनिक तंत्रज्ञानाची मदत : कमी पाण्याच्या पिकांची लागवड करा

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : कृषी विकासाच्या बाबतीत गोंदिया जिल्हा अजूनही खूप मागे आहे. शेतकऱ्यांच्या पारंपरिक मानसिकतेमुळे शेतीचा विकास पाहिजे त्या गतीने होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकीकडे कृषी क्षेत्रात पीक पध्दतीमध्ये बदल व सुधार करण्यासाठी सर्व सामान्य शेतकऱ्यांचा मानसिकतेत बदल घडवून आणणे आवश्यक आहे. शासन, प्रशासन आणि जबाबदार लोकप्रतिनिधी यांनी त्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण निर्माण करण्याची गरज आहे. तरच कृषी विकासाला गती मिळू शकते.१ जुलै महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचा जन्मदिन असून त्यांची जयंती राज्यात कृषी दिन म्हणून साजरी करण्यात येते. वसंतराव नाईक यांना हरित क्रांतीचे शिल्पकार मानले जाते. त्यांनी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाची स्थापना करुन शेतकरी व्यवसायात भर टाकण्यात मोठी कामगिरी बजावली. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नवनवीन प्रयोग केले. वसंतराव नाईकांनी जगाचा निरोप घेवून ३९ वर्षाचा कालावधी लोटला. मात्र त्यांचे कृषी क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य अजुनही लोकांच्या स्मरणात आहेत. शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी कृषी क्षेत्राची समग्र हरितक्रांती घडवून आली का? आज ८० ते ९० टक्के शेतकरी पारंपारिक पीक पध्दतीवर अवलंबून असून कृषी क्षेत्रात खूप मागे आहे. यातच गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी तर आपल्या नशीबाला दोष देत शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाच वापर पीक पध्दतीत बदल करण्यासंदर्भात फार मागे आहे.त्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. त्यासाठी शासन, प्रशासन आणि शेतकरी वर्गात योग्य व नि:स्वार्थ समन्वय साधण्याची गरज आहे. यात सर्वप्रथम शासनाने आपले मताचे राजकारण बाजूला ठेवून शेतकरी वर्ग कायम सुखी जीवन कसा जगेल. या दिशेने धोरणे तयार करुन त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.शासन आणि प्रशासनाने सुध्दा शेतकरी विषयक धोरण आणि निर्णयांची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास शेतकऱ्यांच्या स्थितीत नक्कीच बदल घडून येवू शकतो. शेतकरी वर्गाने आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन यशस्वी प्रयोगांची कॉपी करुन शेती करण्याची गरज आहे. तसेच बाजारपेठेचा कानोसा घेत शेतकºयांनी पिकांची लागवड केल्यास निश्चित मदत होईल.तालुक्याची ४४ टक्के जमीन कृषी उपयोगीसालेकसा तालुक्यातीचे एकूण क्षेत्रफळ ४४ हजार ६४५ हेक्टर एवढे असून त्यापैकी १९ हजार ८९४ हेक्टर जमीन लागवडीसाठी उपयोगात आणली जाते. त्यामध्ये खरीप हंगामात १६ हजार ७५१ हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाते. रबी हंगामात ३ हजार १३५ हेक्टर जमिनीवर विविध प्रकारची पिके घेण्यात येतात. अर्थात फक्त १५ टक्के जमीन रबी हंगामात उपयोगात असून ८५ टक्के शेती पुढील खरीप हंगामापर्यंत पडीक राहते. या पडीक जमिनीची उपयोग करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.पिकांचा पॅटर्न बदलण्याची गरजशेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना बगल देत बाजारपेठेचा अंदाज घेत इतर पिकांची लागवड करण्याची गरज आहे. हवामानात बदल होत असल्याने त्याचा सर्वाधिक परिणाम शेतीवर होत आहे. परिणामी उत्पादनात सुद्धा घट होत असून शेती करणे म्हणजे तोट्याचा सौदा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांची लागवड न करता इतर पिकांची लागवड करण्याची गरज आहे. तरच शेतीतील उत्पन्न वाढविणे शेतकऱ्यांना शक्य होईल.थेट शेतकºयांच्या बांधावरव्हॅलेंटाईन डे, फ्रेन्डशिप डे, असे विविध डे मधून प्रेमभाव व कृतज्ञता व्यक्त केली जाते. कृषीप्रधान देशात व जगाचा पोशिंदा समजल्या जाणाºया शेतकºयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृषी दिनी थेट शेतकºयांच्या बांधावर हा उपक्रम वसंतराव नाईक मानव विकास संशोधन संस्थतर्फे राबविण्यात येत आहे. या उपक्रमातंर्गत शेतकºयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी थेट बांधावर जाऊन शेतकºयांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचे स्वागत केले जाणार आहे.

टॅग्स :agricultureशेती