‘नवतपा’ जिल्ह्याला तापवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 20:47 IST2019-05-19T20:46:33+5:302019-05-19T20:47:14+5:30
उन्हाळा आता खऱ्या अर्थाने आपल्या रंगात आला आहे. रवीराज आता चांगलेच तापू लागले असून अंगाची लाही-लाही होत आहे. त्यात येत्या शनिवारपासून (दि.२५) नवतपाला सुरूवात होत असल्याने भल्याभल्यांना नाव ऐकताच धडकी भरली आहे. आताच पारा ४३ अंश सेल्सिअस पार झाला असताना नवतपात तर काय होणार याची कल्पना करूनच घाम फुटत आहे.

‘नवतपा’ जिल्ह्याला तापवणार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : उन्हाळा आता खऱ्या अर्थाने आपल्या रंगात आला आहे. रवीराज आता चांगलेच तापू लागले असून अंगाची लाही-लाही होत आहे. त्यात येत्या शनिवारपासून (दि.२५) नवतपाला सुरूवात होत असल्याने भल्याभल्यांना नाव ऐकताच धडकी भरली आहे. आताच पारा ४३ अंश सेल्सिअस पार झाला असताना नवतपात तर काय होणार याची कल्पना करूनच घाम फुटत आहे.
उन्हाळ््याच्या अवघ्या चार महिन्यांतील सर्वाधिक गरमी नऊ दिवसांत पडते असे म्हटले जाते व त्यालाच ‘नवतपा’ म्हणतात. नवतपामध्ये रोहिणी नक्षत्र लागत असून रवीराज आपली आग ओकत असल्याने हे नऊ दिवस चांगलेच तापतात. एक प्रकारे सुर्यदेव पृथ्वीच्या अगदी जवळ आल्याचे वाटू लागते. यंदा येत्या शनिवारपासून (दि.२५) २ जून पर्यंत नवतपा लागत आहे. त्यामुळे २५ तारखेपासूनचे नऊ दिवस कसे असणार याची कल्पना करताच अंगाची आग होत आहे.
यंदाचा उन्हाळा अवकाळी पावसाच्या वारंवारच्या हजेरीमुळे कसा तरी निघून गेला. मात्र मे काही सुचू देत नसल्याच अनूभव या २० दिवसांत आला व उन्हाळयाचे चटके चाखायला मिळत आहे. उन्हाच्या तिव्रतेमुळे पारा ४३.५ अंश सेल्सिअस पार करीत आहे. उन्हाची ही सरशी बघता घरातून बाहेर निघणे कठिण झाले आहे. उन्ह वाढतच चालल्याने गरम हवेच्या लाटा वाहत असून अंगाची लाही-लाही होत आहे. परिणामी दुपारी शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे. उन्हामुळे नागरिक घराबाहेर निघणे टाळत असून सायंकाळी कामे आटोपत असल्याचे दिसत आहे.
उन्हाच्या दाहकतेमुळे सायंकाळीही गरम लाटा लागत आहे. यातून उकाडा किती याचा अनूभव येत आहे. अशात नवतपा आणखी किती भाजणार आहे याची धसकी सर्वांनी घेतली आहे. नवतपाचे हे दिवस एकदाचे निघून जावे याचीच सर्व वाट बघत आहेत.
एसी व कूलर झाले फेल
उन्हाळ््यापासून मुक्ती मिळावी यासाठी एसी व कूलरचा सहारा घेतला जात आहे. मात्र उष्णता एवढी आहे की त्यापुढे एसी व कूलरसुद्धा फेल ठरत आहे. उष्ण हवेच्या लाटांमुळे एसी व कूलरची हवा उष्ण होत आहे. मात्र काही केल्या गरमीपासून मुक्तता मिळणे कठिण झाले आहे. तर घरांवर असलेल्या पाण्याच्या टाक्यांतूनही अंगाला भाजून टाकणार एवढे गरम पाणी येत आहे. त्यामुळे दिवसभराच्या उष्णता व घाम यामुळे चिपचिप झालेल्या अंगाला धुवून काढण्यासाठी सायंकाळची आंघोळही कठिण झाली आहे.