शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

नवेगावबांध-नागझिरा प्रकल्प व्याघ्र राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 14:39 IST

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात प्रभावीपणे उपाय योजना राबवून योग्य व्यवस्थापन करण्यात या प्रकल्पाला ७८.९१ टक्के रेटिंग मिळाली असून राज्यात अव्वल स्थान पटकाविले आहे.तर देशात १२ वे स्थान प्राप्त केले आहे.

ठळक मुद्देदेशात १२ व्या स्थानी प्रभावी उपाययोजनांची दखल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात प्रभावीपणे उपाय योजना राबवून योग्य व्यवस्थापन करण्यात या प्रकल्पाला ७८.९१ टक्के रेटिंग मिळाली असून राज्यात अव्वल स्थान पटकाविले आहे.तर देशात १२ वे स्थान प्राप्त केले आहे.राज्यात ६ तर देशात एकूण ५० व्याघ्र प्रकल्प आहेत.या प्रकल्पाचे दरवर्षी केंद्र सरकारकडून रेटींग केले जाते. नवेगावबांध नागझिरा व्याघ्र प्रकल्पाने योग्य व्यवस्थापन आणि प्रभावीपणे उपाययोजना करुन देशात प्रसिध्द असलेल्या जिम कार्बेट, मेळघाट, ताडोबा, पेंच मुदुमलाई, सुंदरवन, बांधवगड, रणथंभोर या प्रकल्पाने मागे टाकले आहे. २९ जुलैला जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्वी दिल्ली येथे आयोजित चौथ्या अखिल भारतीय व्याघ्र गणना व चौथ्या व्यवस्थापन मुल्याकंन अहवाल जाहीर केला.यात नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात महाराष्ट्रातून अव्वल तर देशातून १२ वे स्थान प्राप्त झाले. या वेळी नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मनिकंड रामानुज उपस्थित होते. देशातील सर्व व्याघ्र प्रकल्पात राबविण्यात येणाऱ्या विविध उपाय योजना आणि व्यवस्थापनाचे केंद्र सरकारकडून चार वर्षांत मुल्याकंन केले जाते.३२ विषय आणि क्षेत्रीय भेटी आणि प्रकल्पातील कर्मचाऱ्यांशी चर्चा आणि कार्यालयीन कागदपत्रांची तपासणी करुन हा अहवाल तयार केला जातो.यासाठी एक समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती वन्यजीव व्यवस्थापन,अधिवास विकास, वन्यजीव सुरक्षा,लोकसहभागातून विकास कार्य,जनजागृती, निसर्ग पर्यटन व्यवस्थापन आदी विषयांचे निरीक्षण करुन मुल्याकंन केले जाते.केंद्र सरकारने १९७३ मध्ये देशात वाघांची संख्या वाढविण्यासाठी आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी या प्रकल्पाची सुरूवात करण्यात आली. त्यावेळी केवळ देशात ९ व्याघ्र प्रकल्प अस्तीत्त्वात होते.आता ही संख्या ५० वर पोहचली आहे. नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्प २०१३ अस्तीत्त्वात आला. हा राज्यातील ४६ वा व्याघ्र प्रकल्प होता. महाराष्ट्रातील एकूण सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प असून दरवर्षी देश विदेशातील हजारो पर्यटक येथे भेट देत असून यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होत आहे.

नवेगावबांध-नागझिरा प्रकल्पातील महत्त्वपूर्ण कामेनवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रात येणाऱ्या पाच गावांचे पुनर्वसन करण्यात आले. बफर झोन क्षेत्रातील १४० गावांमध्ये डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेतंर्गत मागील चार वर्षात २६ कोटी ५० लाख रुपयांचे अनुदान प्राप्त करुन देण्यात आले.व्याघ्र प्रकल्पाच्या सुरक्षेकरिता ११२ जवान आणि अधिकाऱ्यांचा विशेष व्याघ्र सुरक्षा दल स्थापन करण्यात आला आहे. वन्यजीवांसाठी १३०० हेक्टरवर तन निमूर्लन, २ हजार हेक्टरवर चारा विकास प्रकल्प, ११२ कृत्रिम पाण्याचे स्त्रोत आणि त्यावर सोलर पंपाची व्यवस्था आणि ६५ शिकार विरोधी सुरक्षा कुटी तयार करण्यात आल्या आहेत हे विशेष.नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला राज्यात अव्वल तर देशात १२ स्थान प्राप्त होणे ही जिल्हावासीयांसाठी अभिमानाची बाब आहे.या प्रकल्पाचे योग्य व्यवस्थापन करण्यात वन्यजीव विभागात कार्यरत प्रत्येकाचे महत्त्वपूर्ण योगदान असून त्यांच्याच मेहनतीचे हे फलित आहे.- मनिकंड रामानुज,वनसंरक्षक वन्यजीव विभाग गोंदिया.

टॅग्स :Navegaonbandh Sanctuaryनवेगावबांध अभयारण्य