मुद्रा योजना चित्ररथाला केले रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 21:46 IST2018-06-10T21:46:05+5:302018-06-10T21:46:05+5:30
जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समिती व नियोजन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या मुद्रा योजनेची माहिती देणाऱ्या चित्ररथाचे उद्घाटन पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.

मुद्रा योजना चित्ररथाला केले रवाना
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समिती व नियोजन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या मुद्रा योजनेची माहिती देणाऱ्या चित्ररथाचे उद्घाटन पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून जास्तीतजास्त गरजू व बेरोजगार व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच स्वावलंबी बनविण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा यासाठी मुद्रा योजना चित्ररथ तयार करण्यात आले असून पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते उद्घाटन करून रवाना करण्यात आले.
याप्रसंगी पं.स. सभापती गिरीधारी हत्तीमारे, उपसभापती राजेश कठाणे, जि.प. सदस्य शिला चव्हाण, पं.स. सदस्य कविता रंगारी, मंजू डोंगरवार, माजी पं.स. सभापती पदमा परतेकी, तहसीलदार विठ्ठल परळीकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नीरज जागरे, आदिवासी विकास महामंडळाचे पाटील, लक्ष्मीकांत धनगाये, शामराव शिवणकर, उमेश महतो उपस्थित होते.