खासदारांनी घेतला रेल्वेस्थानक संबंधित समस्यांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:25 IST2021-02-08T04:25:34+5:302021-02-08T04:25:34+5:30

येथील रेल्वेस्थानकात वाहनतळाची समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे. रेल्वेस्थानकाला असलेल्या पूर्व रस्त्याची समस्या लोकांसाठी त्रासदायक ठरत आहे. यासह इतर ...

The MPs took stock of the railway station related issues | खासदारांनी घेतला रेल्वेस्थानक संबंधित समस्यांचा आढावा

खासदारांनी घेतला रेल्वेस्थानक संबंधित समस्यांचा आढावा

येथील रेल्वेस्थानकात वाहनतळाची समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे. रेल्वेस्थानकाला असलेल्या पूर्व रस्त्याची समस्या लोकांसाठी त्रासदायक ठरत आहे. यासह इतर अडचणींना घेऊन यापूर्वी दोनदा बैठका झाल्या. यावर शनिवारी पुन्हा एकदा खा. मेंढे यांनी रेल्वे, महसूल आणि नगर परिषद प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन रेल्वेस्थानकात बैठक घेतली. वाहनतळाची व्यवस्था तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश यावेळी खासदारांनी दिले. यावेळी भूमिअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. प्रत्येक वेळी बैठकांमध्ये तेच ते विषय न करता यावर ताबडतोब तोडगा काढला जावा असे स्पष्ट संकेतही यावेळी त्यांनी दिले. रेल्वेस्थानक परिसरात नागरिकांना येणाऱ्या अन्य अडचणीही सोडविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. याप्रसंगी निवासी जिल्हाधिकारी जयराम देशपांडे, धनलाल ठाकरे, गजेंद्र फुंडे, डी. एस. एल. आर. अनिल पटले, नायब तहसीलदार सिंगाडे, रेल्वे अभियंता मल्लिकार्जुन अरविंदकुमार, नगर परिषद अभियंता अनिल दाते, दाडी मदन आदी उपस्थित होते.

Web Title: The MPs took stock of the railway station related issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.