जि.प.सदस्याचे सभापतीच्या टेबलावर ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 06:00 AM2020-01-19T06:00:00+5:302020-01-19T06:00:08+5:30

जिल्हा परिषदेच्या दैनदिन कामाला शनिवारी (दि.१८) सकाळी १० वाजतापासून सुरूवात झाली. सर्व काही सुरळीतपणे सुरू असताना जि.प.सदस्य विठोबा लिल्हारे यांनी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जि.प.मध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी थेट शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले यांचे कक्ष गाठले. तेव्हा कक्षात सभापती अंबुले उपस्थित नव्हते. त्यांनी थेट सभापती यांच्या टेबलावरच ठाण मांडले.कक्षातील कर्मचारी सुध्दा या प्रकाराने काही क्षण अवाक झाले.

The movement of the GP member to the table of the chairperson | जि.प.सदस्याचे सभापतीच्या टेबलावर ठिय्या आंदोलन

जि.प.सदस्याचे सभापतीच्या टेबलावर ठिय्या आंदोलन

Next
ठळक मुद्देउपाध्यक्षांच्या मध्यस्तीनंतर आंदोलन मागे । कामे वाटप करताना विश्वासात घेतले नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नागरा जि.प.क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य विठोबा लिल्हारे यांनी त्यांच्या क्षेत्रात मंजूर करण्यात आलेली कामे वाटप करताना आरोग्य व शिक्षण सभापती यांनी कुणाच्या तरी सांगण्यावरुन आपल्याला डावलल्याचा आरोप करीत शनिवारी (दि.१८) जि.प.तील त्यांच्या टेबलावरच ठाण मांडून जवळपास दोन तास ठिय्या आंदोलन केले. यामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली होती. एखाद्या जि.प.सदस्याने अशा प्रकारचे आंदोलन प्रथमच केल्याचे बोलल्या जाते.
जिल्हा परिषदेच्या दैनदिन कामाला शनिवारी (दि.१८) सकाळी १० वाजतापासून सुरूवात झाली. सर्व काही सुरळीतपणे सुरू असताना जि.प.सदस्य विठोबा लिल्हारे यांनी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जि.प.मध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी थेट शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले यांचे कक्ष गाठले. तेव्हा कक्षात सभापती अंबुले उपस्थित नव्हते. त्यांनी थेट सभापती यांच्या टेबलावरच ठाण मांडले.कक्षातील कर्मचारी सुध्दा या प्रकाराने काही क्षण अवाक झाले. मात्र त्यांना टेबलावर का बसले हे विचारण्याचे धाडस कर्मचाऱ्यांनी केले नाही. दरम्यान या प्रकाराची माहिती जि.प.च्या इमारतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती झाली. यानंतर अनेकांनी सभापतींच्या कक्षाकडे धाव घेतली. विठोबा लिल्हारे यांना हे आंदोलन कशासाठी करीत आहात अशी विचारणा केल्यावर त्यांनी जि.प.शिक्षण व आरोग्य विभागातर्फे आपल्या जि.प.क्षेत्रात ३५ लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली.तसेच या कामांचे वाटप करण्यात आले. एका माजी आमदाराच्या सांगण्यावरुन यापैकी एकही काम आपल्याला विश्वासात न घेता वाटप करण्यात आले. हा आपल्यावर अन्याय असून याचा विरोध करण्यासाठी आपण हे ठिय्या आंदोलन करीत असल्याचे सांगितले. अनेकांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. दरम्यान जि.प.उपाध्यक्ष अल्ताफ हामिद, राष्टÑवादी काँग्रेसचे गटनेते गंगाधर परशुरामकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे यांनी विठोबा लिल्हारे यांची समजूत काढली. तसेच सोमवारपर्यंत त्यांच्या मागणीवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
यासंदर्भात शिक्षण सभापती रमेश अंबुले यांच्याशी संपर्क साधला असता मागील आठ दिवसापासून लिल्हारे हे आपल्याकडे कामाच्या पत्राची मागणी करीत होते. मात्र हे काम बांधकाम विभाग आणि सर्व शिक्षा अभियानांतर्गत केली जात आहे. त्यामुळे ती कामे देणे आपल्या अधिकार क्षेत्रात नसल्याचे सांगितले. तसेच लिल्हारे यांनी केलेले आरोप निराधार असल्याचे सांगितले.

जि.प.शिक्षण व आरोग्य विभागातंर्गत आपल्या क्षेत्रात ३५ लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली. मात्र ही कामे वाटप करताना आपल्याला विश्वासात घेण्यात आले नाही. त्यामुळेच आपण ठिय्या आंदोलन केले. जि.प.उपाध्यक्ष अल्ताफ हमीद आणि जिल्हाध्यक्ष पुरूषोत्म कटरे यांनी सोमवारपर्यंत यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.त्यामुळे आपण हे आंदोलन मागे घेतले.
- विठोबा लिल्हारे, जि.प.सदस्य.

Web Title: The movement of the GP member to the table of the chairperson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.