अपंगांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By Admin | Updated: October 27, 2015 02:10 IST2015-10-27T02:10:46+5:302015-10-27T02:10:46+5:30
समाजातील उपेक्षित अपंग आपल्या विविध मागण्यांना घेऊन सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. जिल्ह्यात २९

अपंगांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
गोंदिया : समाजातील उपेक्षित अपंग आपल्या विविध मागण्यांना घेऊन सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. जिल्ह्यात २९ हजार अपंग असून ८०० अपंग जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्च्यात सहभागी झाले होते.
अपंगांना संजय गांधी निराधार योजनेचे ३ हजार रुपये मानधन द्यावे, नोकरीत ६ टक्के आरक्षण द्यावे, बेरोजगार अपंगांना बीज भांडवल योजनेंतर्गत दोन लाख रुपयाची उत्पन्न मर्यादा व बीपीएलची अट न घालता थेट कर्ज वितरण करण्यात यावे, सक्षम अपंगांना निम्म शासकीय किंवा इतर खासगी कंपनीत सेवा करारावर नियुक्त करण्यायास १०० टक्के अनुदानावर तीनचाकी मोटारसायकल देण्यात यावी, अपंग वित्त व विकास महामंडळामार्फत बेरोजगार अपंगांना १ लाख रुपये कर्ज द्यावे, स्पर्धा परीक्षेत ३० मिनीटाचा वेळ अधिक दयावा, स्पर्धा परीक्षेचे परीक्षा शुल्क माफ असावे, परीक्षेला ये-जा करण्यासाठी लागणारे पैसे देण्यात यावे, कुटुंब प्रमुख किंवा कोणत्याही कुुटुंबातील व्यक्ती अपंग असल्यास त्या कुटुंबाचा बीपीएल यादीत समावेश असावा, अपंगांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, अशा विविध मागण्यांचा समावेश होता.नेतृत्व दिगंबर बन्सोड, जिल्हा सचिव दिनेश पटले, एस.टी. भोंगाडे, श्यामसुंदर बन्सोड, पुरुषोत्तम कावळे यांनी केले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. मोर्च्यात विनोद शेंडे, झामेंद्र लिल्हारे, आकाश मेश्राम, राखी चुटे, रवी तुरकर, लोकेश लिल्हारे, चंद्रशेखर कुंभरे, ओमप्रकाश आंबेडारे, नरेंद्र मानकर, अशोक बिसेन, शेखर लांजेवार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)