शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी मोक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:13 IST

गोंदिया : शहरासह जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी बोकाळली आहे. या गुन्हेगारीच्या जोरावर काही गावगुंडांनी स्वत:चे वर्चस्व निर्माण केले आहे. या ...

गोंदिया : शहरासह जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी बोकाळली आहे. या गुन्हेगारीच्या जोरावर काही गावगुंडांनी स्वत:चे वर्चस्व निर्माण केले आहे. या दमनचक्राला पोलिसांनी वेळीच उद‌्ध्वस्त केले नाही तर शांतताप्रिय जिल्ह्याला घरघर लागल्याशिवाय राहणार नाही. मागील दोन वर्षांत वर्चस्ववादातून आणि संघटित गुन्हेगारीसह परस्पर वैमनस्यातून तब्बल ७० जणांना ठार करण्यात आले, तर ३२ जणांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जिल्ह्यात रेतीमाफियांमुळे मोठ्या प्रमाणात गँगवाॅर होत असतात. हे प्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने या अट्टल गुन्हेगारांवर मोक्का लावून त्यांना तुरुंगातच ठेवण्याची तयारी दर्शविली आहे.

मागील दोन वर्षांत दोन संघटित गुन्हेगारी टोळक्यांतील अनेक गुंडांवर मोक्कांतर्गत तसेच एमपीडीअंतर्गत कारवाई करून स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. आपले वर्चस्व टिकवून ठेवण्याच्या नादात खून करणे, हा त्यांच्यासाठी सोपा मार्ग होऊन बसला आहे. गावठी दारू, गांजा, जुगार ते विदेशी नशेचा बाजार मांडून अनेकजण गडगंज झाले आहेत. महात्मा गांधी यांचा शांतीप्रिय जिल्हा असा लौकिक असलेल्या गोंदिया जिल्ह्याला गुन्हेगारीचा विळखा पडला आहे. जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी पाहून पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी ११ जानेवारी रोजी पहिल्यांदाच मुंबई पोलीस कायदा कलम ५५चा वापर करीत १८ गुन्हेगारांना हद्दपार केले. सन २०१९मध्ये ३७ खून, तर १८ खुनाचे प्रयत्न झाले होते. सन २०२०मध्ये ३३ खून व १४ खुनाचे प्रयत्न झाले आहेत. गोंदियात होणाऱ्या बहुतांश खुनांत देशी कट्ट्याचा वापर होतो. हे कट्टे येतात कोठून, याच्या मुळापर्यंत जाण्याचे आव्हान गोंदिया पोलिसांपुढे आहे.