सायकल रॅलीतून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:26 AM2021-01-18T04:26:55+5:302021-01-18T04:26:55+5:30

गोंदिया : पर्यावरण संंरक्षण व संंवर्धनाचा संदेश देण्यासाठी राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या जनजागृतीसाठी येथील ...

The message of environmental conservation conveyed through bicycle rallies | सायकल रॅलीतून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

सायकल रॅलीतून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Next

गोंदिया : पर्यावरण संंरक्षण व संंवर्धनाचा संदेश देण्यासाठी राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या जनजागृतीसाठी येथील नगर परिषदेच्या वतीने रविवारी (दि.१७) सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील मुख्य मार्गांनी निघालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येत नागरिकांनी असभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी नागरिकांना जागरूक करण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविले जात आहे. २ ऑक्टोबर ते ३१ मार्च या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या या अभियानांतर्गत नगर परिषदेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याअंतर्गत शहरवासीयांना ‘माझी वसुंधरा’ या अभियानाबाबत माहिती व्हावी जेणेकरून पर्यावरण संवर्धन व संरक्षणात त्यांचा हातभार लागावा या उद्देशातून रविवारी (दि.१७) सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष अशोक इंगळे व मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. नगराध्यक्ष इंगळे व मुख्याधिकारी चव्हाण यांनी, पर्यावरण रक्षणासाठी, तसेच आपले आरोग्य जपण्यासाठी नागरिकांनी वाहनांऐवजी सायकलचा जास्तीत जास्त वापर करावा, असे सांगितले. याप्रसंगी नगर परिषद सदस्य धर्मेश अग्रवाल, सुनील तिवारी, शकील मन्सुरी, क्रांती जायस्वाल, हेमलता पतेह, मुजीब पठाण, सायकलिंग संडे ग्रुपचे सदस्य, नगर परिषद कर्मचारी व अन्य नागरिक सहभागी झाले होते.

-------------------------

जयस्तंभ चौकातून रॅलीचा शुभारंभ

सकाळी ६.३० वाजता येथील जयस्तंभ चौकातून निघालेली रॅली बलाघाट टी-पॉइंट, कुडवा नाका, अंडरग्राऊंडस्‌ राजस्थान स्कूल मार्गाने नगर परिषद कार्यालयात आली. येथे रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांना नगर परिषदेकडून प्रशस्तीपत्र आणि ‘माझी वसुंधरा’ टी-शर्टचे वितरण करण्यात आले.

Web Title: The message of environmental conservation conveyed through bicycle rallies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.