शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
4
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
5
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
7
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
8
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
9
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
10
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
11
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
12
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
13
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
14
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
15
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
16
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
17
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
18
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
19
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
20
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांसाठी मुरदोलीत साकारणार ‘मेगा सर्किट’

By admin | Updated: June 7, 2014 23:59 IST

विपुल नैसर्गिक साधनसंपत्तीने व नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या गोरेगाव तालुक्यातील मुरदोली येथील जंगलात पर्यटनाला भरपूर वाव आहे. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी)

७.३२ कोटी मंजूर : एक हेक्टर जागेवर होणार उभारणी
दिलीप चव्हाण- गोरेगाव
विपुल नैसर्गिक साधनसंपत्तीने व नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या गोरेगाव तालुक्यातील मुरदोली येथील जंगलात पर्यटनाला भरपूर वाव आहे. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) मुरदोली येथे पर्यटकांसाठी ‘मेगा सर्किट’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तब्बल सात कोटी ३२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सदर ‘मेगा सर्किट’ एक हेक्टर जागेवर उभे होणार आहे.
एमटीडीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक हनुमंत हेडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या प्रकल्पासाठी लागणार्‍या जागेसंदर्भात पाहणी केली असून तहसीलदार डी.ए.सपाटे यांनी मुरदोली येथील गट नं. १५६ ही जमीन देण्यास हिरवी झेंडी दिली आहे. महसूल विभागाच्या या एक हेक्टर जमिनीवर मुरदोली पर्यटन प्रकल्प उभा राहणार आहे.
मुरदोली येथील नागझिरा गेटसमोर तलावाच्या जवळ मेगा पर्यटन प्रकल्पाची उभारणी होणार आहे. सदर जागा गोंदिया-कोहमारा मुख्य मार्गावर असल्यामुळे हौशी निसर्गप्रेमी पर्यटक येथे येतील. त्यामुळे तालुक्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या पर्यटन प्रकल्पाच्या उभारणीसाठी केंद ्रशासन ८0 टक्के व उर्वरित २0 टक्के रक्कम राज्य शासनाकडून प्राप्त होणार आहे. सदर निधी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला प्राप्त होणार आहे.