प्राथमिक शिक्षकांच्या मागण्या मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:00 IST2020-07-25T05:00:00+5:302020-07-25T05:00:39+5:30
केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांचा प्रभार सेवाजेष्ठ पदवीधर शिक्षक अथवा सेवाजेष्ठ शिक्षक यांना देण्यात यावा, या विषयीच्या शिक्षणाधिकारी जि.प. गोंदिया यांच्या पत्रानुसार योग्य कारवाई करणे, जि.प. गोंदियावरून एकस्तर वेतनश्रेणी मंजूर होऊन आलेल्या शिक्षकांना जुलै २०२० च्या वेतनात एकस्तर वेतनश्रेणीनुसार वेतन देणे, सेवा पुस्तीका ऑनलाईन कार्यवाही करणे, शाळा सुरू होण्यापूर्वी शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी,.....

प्राथमिक शिक्षकांच्या मागण्या मार्गी लावा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या मागण्या त्वरीत मार्गी लावण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका देवरीच्यावतीने गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्या निकाली काढण्यात याव्यात यासाठी तालुका संघाच्यावतीने गटशिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली. केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांचा प्रभार सेवाजेष्ठ पदवीधर शिक्षक अथवा सेवाजेष्ठ शिक्षक यांना देण्यात यावा, या विषयीच्या शिक्षणाधिकारी जि.प. गोंदिया यांच्या पत्रानुसार योग्य कारवाई करणे, जि.प. गोंदियावरून एकस्तर वेतनश्रेणी मंजूर होऊन आलेल्या शिक्षकांना जुलै २०२० च्या वेतनात एकस्तर वेतनश्रेणीनुसार वेतन देणे, सेवा पुस्तीका ऑनलाईन कार्यवाही करणे, शाळा सुरू होण्यापूर्वी शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, प्रलंबित देयके, सन २०१२, २०१३ व २०१८ ला झालेल्या प्रशासकीय बदली प्राप्त शिक्षकांचे प्रस्तावर भत्ता, चट्टोपाध्याय व वरिष्ट वेतनश्रेणीचे प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठविणे, डीसीपीएसधारक शिक्षकांचे हिशेब पावती देण्याची मागणी करण्यात आली.
या मागण्यांचा पाठपुरावा करण्यात येईल असे गटशिक्षणाधिकारी यांनी सांगितले. शिष्टमंडळात तालुका नेते एस. एच. गभने, अध्यक्ष रमेश उईके, जिल्हा कोषाध्यक्ष ए. डी. धारगावे, कार्याध्यक्ष जे. एन. आकरे, सरचिटणीस रोशन टेंभूर्णे, जितेंद्र कोहाडकर, भारत सोनटक्के, मंगलदास सयाम, राजेश रामटेके, निकेश सुखदेवे, मनोज गेडाम, मिलिंद दामले, धनराज धानगाये, लोकेश मेश्राम, के.बी. गभने, एस.आर. लांजेवार, राजेश ब्राम्हण, विष्णू टेकाडे, प्रणीत कराडे, देवेंद्र वलथरे यांचा समावेश होता.