कार अपघातात मेडिकल व्यावसायिक अतुल गणेश अग्रवाल ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 11:16 IST2021-03-12T11:16:09+5:302021-03-12T11:16:21+5:30
अतुल अग्रवाल यांचे रावणवाडी येथे मुक्ता मेडिकल असून ते आज सकाळी गोंदिया येथून मेडीकल उघडण्यासाठी कारने जात होते.

कार अपघातात मेडिकल व्यावसायिक अतुल गणेश अग्रवाल ठार
गोंदिया : भरधाव कारने झाडाला धडक दिल्याने गोंदिया मेडिकल व्यावसायिक घटनास्थळी ठार झाला.
ही घटना आज सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास गोंदिया बालाघाट मार्गावरील आंभोरा जवळ घडली. अतुल गणेश अग्रवाल असे अपघातात ठार झालेल्या मेडिकल व्यावसायिकाचे नाव आहे. अतुल अग्रवाल यांचे रावणवाडी येथे मुक्ता मेडिकल असून ते आज सकाळी गोंदिया येथून मेडीकल उघडण्यासाठी कारने जात होते. यादरम्यान हा अपघात घडला.