वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मुख्यालयाला ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:00 IST2020-05-11T05:00:00+5:302020-05-11T05:00:07+5:30

प्राथमिक आरोग्य केंद्राचा पदभार सांभाळणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कुळकर्णी या सुमारे १५ कि.मी. अंतरावरील ग्राम झरपडा या आपल्या स्वगावावरून तर डॉ. कुलसुंगे हे बोंडगावदेवी वरून ये-जा करित असल्याचे सांगीतले जाते. पीएचसीची कमान सांभाळणाऱ्या डॉ. कुळकर्णी यांना आणायला पीएचसीची गाडी नित्यनेमाने त्यांच्या राहत्या गावी किंवा अर्जुनी-मोरगावला जात असल्याची माहिती आहे.

Medical officers 'lost' to headquarters | वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मुख्यालयाला ‘खो’

वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मुख्यालयाला ‘खो’

ठळक मुद्देचान्ना आरोग्य केंद्रातील प्रकार : ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय, वरिष्ठांनी दखल घ्यावी

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : गावातील शेवटच्या टोकापर्यंत आरोग्य सेवा पोहचावी म्हणून शासन स्तरावरून शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. गावखेड्यात प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण झाले. प्रशस्त व सुसज्ज अशा रंगरंगोटीसह आरोग्य केंद्राच्या इमारती बांधण्यात आल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांसाठी सर्व सोयीयुक्त निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. सर्व सोयी व आकर्षक अशा सेवेचा मेहनताना असताना सुद्धा मुख्यालयी न राहता सोयीच्या ठिकाणावरून वैद्यकीय अधिकारी ये-जा करित असल्याचा प्रकार जवळच्या ग्राम चान्ना बाक्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मागील काही दिवसांपासून सर्रासपणे सुरू आहे.
आरोग्य सेवेपासून गावखेड्यातील सर्वसामान्य वंचित राहू नये म्हणून वाहतुकीचे जाण्या-येण्याचे कोणतेही साधन नसताना ग्राम चान्ना-बाक्टी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मागील काही वर्षांपासून सुरू करण्यात आले आहे. बोंडगावदेवी परिसरातील बहुतेक गावांचा या प्राथमिक आरोग्य केंद्रात समावेश करण्यात आला आहे. आजघडीला सदर प्राथमिक आरोग्य केंद्राची कमान वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुळकर्णी (डोंगरगाव) यांच्यासह डॉ. कुंदन कुलसुंगे यांच्याकडे आहे. डॉ. कुळकर्णी या नागपूर वरून इथे रूजू झाल्या तर डॉ. कुलसुंगे हे बोंडगावदेवीच्या जि.प.आयुर्वेदीक दवाखान्यातून रूजू झाल्याची माहिती आहे. सध्या स्थितीत दोन्ही वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याची जनतेची ओरड आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचा पदभार सांभाळणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कुळकर्णी या सुमारे १५ कि.मी. अंतरावरील ग्राम झरपडा या आपल्या स्वगावावरून तर डॉ. कुलसुंगे हे बोंडगावदेवी वरून ये-जा करित असल्याचे सांगीतले जाते. पीएचसीची कमान सांभाळणाऱ्या डॉ. कुळकर्णी यांना आणायला पीएचसीची गाडी नित्यनेमाने त्यांच्या राहत्या गावी किंवा अर्जुनी-मोरगावला जात असल्याची माहिती आहे. शासकीय वाहन आपल्या सोयीनुसार वापरण्याचा प्रकार सर्रास होत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील जनता बाहेरगावावरून ये-जा करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची तासन तास प्रतीक्षा करित असल्याचे दिसून येत आहे. सर्व सोयीयुक्त निवासाची सोय असताना वैद्यकीय अधिकारी ‘खो’ देत असल्याचा प्रकार सध्या पीएचसीमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची वरिष्ठांनी दखल घेवून कारवाई करण्याची मागणी आहे.

Web Title: Medical officers 'lost' to headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.