शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

यांत्रिक युगातही बैलगाडीची जागा कायम

By admin | Updated: April 30, 2015 01:07 IST

काळ बदलला, वेळ बदलली या आधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाच्या युगात सर्वच क्षेत्रात आमुलाग्र बदल होत आहे.

गोंदिया : काळ बदलला, वेळ बदलली या आधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाच्या युगात सर्वच क्षेत्रात आमुलाग्र बदल होत आहे. शेतीच्या कामांसाठी ट्रॅक्टरचा मोठया प्रमाणावर वापर होत असला तरीही बैलगाडीची जागा अद्याप कायम आहे. काळाच्या ओघात मात्र लाकडीऐवजी लोखंडी बैलगाडी बनविण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.स्वातंत्र्यपूर्व काळापासून ग्रामीण भागातील दळणवळणाचे साधन म्हणून बैलगाडीचा वापर होत आहे. शेतातील शेतमाल घरापर्यंत आणायला आजही बैलगाडीला तेवढेच महत्त्व आहे. पूर्वी वऱ्हाड मंडळींना लग्न सोहळ््यापर्यंत पोहोचायला बैलगाडीचाच वापर केला जात होता. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात बदलाचे वारे वाहत आहे. बदला बरोबर बैलगाडीचे स्वरूपही बदलत चालले आहे. लाकडी गाडी तयार करण्याचा व्यवसाय पूर्वीपासून होता. पूर्वीसुतार सागवानपासून टिकावू दर्जेदार बैलगाड्या बनवित होते. आज सागवान लाकूडही दुर्मिळ झाले आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी बाभळीच्या लाकडापासून बैलगाडी बनविण्याला पसंती दिली. वर्षभर वापरलेली लाकडी बैलगाडी वर्षाअखेर प्रत्येक शेतकऱ्याला सुताराकडून दुरुस्त करून घ्यावी लागत असे. चाकेही लाकडी असल्याने कधी-कधी माल वाहतूक करताना मोडत असे. त्या लाकडी चाकांवर लोखंडी येटपट्टा लावण्याचे काम लोहार करीत असत. लाकडी बैलगाड्यांच्या दुरुस्तीबाबत होत असलेली डोकेदुखी संपावी म्हणून शेतकरी आता लोखंडी बैलगाडीकडे वळू लागले आहे. आता बैलगाडीचे लाकडी कलाकुसरीचे पारंपरिक रूप बदलले असून शेतकरीवर्ग लोखंडी बैलगाडीला अधिक पसंती देत आहे. मशागतीसह मालवाहतुकीकरिता ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असला तरी शेतात जाणारे अरुंद रस्ते, वसाहतीमधील अंतर्गत लहान रस्ते तसेच पावसाळ््यात होणाऱ्या चिखलातून आजही माल वाहतुकीसाठी बैलगाडीच कामी येते. सध्या मोठया संख्येने शेतकरी वेल्डींग वर्कशॉपवरून लोखंडी बैलगाड्या बनवून घेत असल्याचे ग्रामीण भागात दिसून येते. लाकडी बैलगाड्या बनविणे बंद केल्याने सुतारांच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. लाकडी बैलगाडी आता इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. (शहर प्रतिनिधी)