मारूती कारची ट्रॅव्हल्सला धडक : तीन जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 20:29 IST2018-06-07T20:29:58+5:302018-06-07T20:29:58+5:30

भरधाव मारूती सुझूकी कारने समोरुन येणाऱ्या ट्रॅव्हल्सला धडक दिली. यात तीन जण जखमी झाल्याची घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी येथील मातोश्री रमाई चौकात बुधवारी (दि.६) रात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही.

Maruti car hits three people: injured | मारूती कारची ट्रॅव्हल्सला धडक : तीन जण जखमी

मारूती कारची ट्रॅव्हल्सला धडक : तीन जण जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : भरधाव मारूती सुझूकी कारने समोरुन येणाऱ्या ट्रॅव्हल्सला धडक दिली. यात तीन जण जखमी झाल्याची घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी येथील मातोश्री रमाई चौकात बुधवारी (दि.६) रात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही. अर्जुनी-मोरगाव येथील व्यावसायिक दादा फुंडे पत्नी व मुलासह मारुती सुझूकी सियाझ कार (एमएच ४०/एआर-६८११) या आपल्या गाडीने नागपूरवरुन अर्जुनी मोरगावला परतत होते. दरम्यान बोंडगावदेवी येथील रमाई चौकात दिघोरी मार्गाने येणाºया ट्रॅव्हल्सला मारोती कारने जोरदार धडक दिली.
या धडकेत दोन्ही वाहनाचे नुकसान झाले. तर कारमधील दादा फुंडे, त्यांची पत्नी व मुलगा जखमी झाले.
या सर्वांना लगेच अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बिट अंमलदार निकोडे करीत आहे.
गतिरोधक तयार करण्याची मागणी
येथील रमाई चौकात बाराभाटी-दिघोरी व अर्जुनी ते सानगडी हे दोन मार्ग येऊन मिळतात. तर मुख्य चौक असल्याने येथे नेहमीच वाहनांची वर्दळ असते. मात्र या ठिकाणी गतिरोधक नसल्याने बरेचदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे गतिरोधक तयार करण्याची मागणी आहे.

Web Title: Maruti car hits three people: injured

टॅग्स :Accidentअपघात