शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

तेंदूपत्ता तोडणाऱ्या मजुरांना हिवतापाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 8:56 PM

तेंदूपत्ता तोडण्यासाठी इतर राज्यांमध्ये गेलेल्या मजुरांवर आता जिल्हा मलेरिया विभागाची नजर लागून आहे. या मजुरांचा परतीचा प्रवास आता सुरू आहे. हे मजूर आपल्यासह मलेरियाचा आजार तर घेवून येणार नाही, याची चिंता विभागाला सतावत आहे.

ठळक मुद्देदोन महिन्यांत १६ पॉझिटिव्ह : १९० दिवसांचा मलेरिया निर्मूलन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तेंदूपत्ता तोडण्यासाठी इतर राज्यांमध्ये गेलेल्या मजुरांवर आता जिल्हा मलेरिया विभागाची नजर लागून आहे. या मजुरांचा परतीचा प्रवास आता सुरू आहे. हे मजूर आपल्यासह मलेरियाचा आजार तर घेवून येणार नाही, याची चिंता विभागाला सतावत आहे.दरवर्षी जिल्ह्यातील मजूर तेंदूपत्ता तोडण्यासाठी मध्य प्रदेश, छत्तीसगड व इतर राज्यांमध्ये जातात व तेथे ते जंगलातच राहतात. या दरम्यान डासांनी चावा घेतल्यामुळे त्यांना मलेरिया होत आहे. ते जेव्हा स्वगृही परततात तेव्हा ते मलेरियाचे रूग्ण असतात. परंतु याची माहिती त्यांना राहत नाही. त्यांचे शरीर तापलेले असते.ज्यांचा वेळेवर उपचार होतो ते या आजारातून वाचतात. एकदा तर गोंदिया जिल्ह्यात केवळ एका वर्षात मलेरियामुळे १४ जणांचा मृत्यू झाला होता. परंतु आता प्रयत्नातील सातत्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे. मागील वर्षी जिल्ह्यात मलेरियाच्या आजाराने एकाचाही मृत्यू झाला नाही.तेंदूपत्ता मजूर केवळ बाहेरील राज्यातच जात नाही तर जिल्ह्यातसुद्धा हजारो तेंदूपत्ता मजुरांना काम मिळत आहे. हे काम उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेत होते.त्यावेळी नाल्यांमध्ये पाणी वाहते राहत नाही. त्यामुळे शहरांमध्ये डासांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मेलेरिया आजाराचा प्रभावही दिसून येत नाही. परंतु जे मजूर तेंदूपत्ता तोडण्यासाठी जातात, ते जंगलात राहतात. तेथेच भोजन करतात व झोपतात. जंगलात वृक्षांवरून पाने पडण्याची एक प्रक्रिया सुरू असते. या पडलेल्या वाळल्या पानांमध्ये डासांचा प्रादुर्भाव होतो व डासांनी चावल्यामुळे मजुरांना मलेरिया होत आहे.१९० गावांमध्ये फवारणी कार्यक्रमजिल्हा हिवताप विभागाच्यावतीने या मजुरांच्या परतीच्या प्रवासाची वेळ बघता कीटनाशक फवारणी कार्यक्रम ११ जूनपासून सुरू करण्यात आला आहे. हा कार्यक्रम १९० गावांमध्ये सुरू आहे व ११ आॅगस्टपर्यंत चालणार आहे. यात प्रामुख्याने आदिवासी गावांचा समावेश आहे. तसेच काही बिगर आदिवासी गावांचा समावेश आहे. तेंदूपत्ता तोडण्याच्या कामावरून परतलेल्या मजुरांना मलेरियाचे औषध कोणत्याही स्थितीत उपलब्ध व्हावे, या बाबीकडे सर्वेक्षणात विशेष लक्ष दिले जात आहे.जून महिन्यात ९ पॉझिटिव्हमे २०१८ मध्ये जिल्ह्यात केवळ ७ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. परंतु जून महिन्यात आतापर्यंत ९ मलेरिया बाधित आढळले आहेत. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने फाईलेरिया, डेंग्यू व मलेरिया आजारांच्या जनजागृतीसाठी प्रशिक्षण दिले जात आहे. त्या अंतर्गत डिजिटल बॅनर व पोस्टर्सचे वितरण प्राथमिक आरोग्य केंद्रांत करण्यात आले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यforestजंगल