शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मका खरेदी केंद्र सुरू होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अर्जुनी मोरगाव : रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली. पीक निघाले. मात्र आधारभूत हमीभाव मका ...

ठळक मुद्देमका उत्पादकांना दिलासा : पाचशे हेक्टरवर लागवड, १० हजारावर शेतकऱ्यांना होणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली. पीक निघाले. मात्र आधारभूत हमीभाव मका खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक होत होती. लोकमतने सुध्दा हा मुद्दा लावून धरला होता. आ. मनोहर चंद्रिकापुरे यांच्या प्रयत्नाने मका खरेदी केंद्र सुरू होणार आहे.त्यामुळे शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे.शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी त्यांनी नगदी पिकाकडे वळावे असा सल्ला कृषी विभागाकडून दिला जायचा. मात्र धान उत्पादक शेतकरी सहसा पीक पद्धतीत बदल करण्याच्या मानसिकतेत नसतो. तरी सुद्धा अर्जुनी मोरगाव तालुक्यात सुमारे ५०० हेक्टर क्षेत्रात मका पीक लागवड करण्यात आली. पीक निघाले. मात्र आधारभूत हमी भाव खरेदी केंद्र सुरू झाले नाही. व्यापारी वाटेल त्या भावाने मका खरेदी करायचे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होते. अनेक शेतकऱ्यांनी आ. चंद्रिकापुरे यांचेकडे धाव घेतली. त्यांनी आपले कर्तव्य पार पाडत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचेशी यासंदर्भात चर्चा केली. ना. भुजबळ यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांचेकडून परवानगी मिळाल्याने खरेदी केंद्र सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भातील आदेश गुरुवारी (दि.७) निर्गमित होणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव सुपे यांनी भ्रमणध्वनीवरून सांगितल्याची माहिती आ.चंद्रिकापुरे यांनी दिली. १७६० रुपये प्रती क्विंटल मक्याला हमीभाव असल्याची माहिती आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मका खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, किशोर तरोणे, अर्जुनी मोरगावचे नगराध्यक्ष किशोर शहारे, रतीराम राणे, पं.स. सदस्य सुशीला हलमारे, उद्धव मेहंदळे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष हेमकृष्ण संग्रामे, योगराज हलमारे, सोमा नरवास यांनी भूमिका मांडली होती.

टॅग्स :Marketबाजार